Subscribe Us

header ads

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर जमीन विक्री प्रकरणी सखोल चौकशी करा जमिनी विक्री रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत--- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांचे निवेदन


अंबाजोगाई / प्रतिनिधी_येथील अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि.अंबासाखर ता. अंबाजोगाई (जि.बीड) यांचे मालकीचे गट नं ४०/२ मधील २५ एकर बेकायदेशीर जमीन विक्री प्रकरणी व कागदोपत्री दर्शविण्यात आलेल्या चुकीच्या मुल्यांकना बाबत तसेच कार्यकारी मंडळाच्या ठरावा बाबत सखोल चौकशी करून सदर जमिनी विक्री तात्काळ रद्द करून दोषींवर अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.याप्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि.अंबासाखर ता. अंबाजोगाई (जि.बीड) हा साखर कारखाना गेल्या ५० वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत आलेला आहे.विद्यमान संचालक मंडळाच्या मनमानी व चुकीच्या कारभारामुळे सदर कारखाना डबघाईला आला असून शेतकऱ्यांचे गेल्या दोन ते तीन हंगामापासून केंद्र सरकारने घालून दिलेल्या एफ.आर.पी नुसार कोट्यावधी रूपयांची ऊस बीले अद्याप ही थकीत आहेत.शेतकऱ्यांना एफ.आर.पी चे पैसे देण्याच्या नावाखाली विद्यमान संचालक मंडळाने दि.०३/०८/२०२१ रोजी सुराणा बिल्डर्स,अंबाजोगाई व ए.एम.के डेव्हलपर्स केज यांना कारखान्याच्या मालकीची तब्बल २५ एकर जमीन बेकायदेशीररीत्या विक्री केली आहे.या जमीन विक्री बाबत मा.साखर आयुक्त,पुणे यांची दि.०७/०६/२०२१ रोजी विद्यमान संचालक मंडळाने व कार्यकारी संचालक यांनी कागदपोपत्री दिशाभुल करून गट नं.४०/२ मधील २५ एकर जमीन विक्रीस परवानगी घेतली.सदर परवानगी देत असताना मा.साखर आयुक्तांनी काही अटी व शर्थी घालून दिलेल्या आहेत.त्या अटी व शर्थीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफ.आर.पी नुसार अद्यापही गेल्या अनेक गळीत हंगामातील कोट्यावधी रूपये बाकी असल्याचे शेतकऱ्यांची तक्रार व ओरड आहे.तसेच सदर जमीन विक्री  प्रकरणी साखर आयुक्त,पुणे यांना कारखाना संचालक मंडळाने प्रस्तावित केलेले  बाजारी मुल्यांकन ८,१२,५०,०००/- (अक्षरी आठ कोटी बारा लाख पन्नास हजार रुपये) दिसून येत आहे.मात्र त्याच शिवारातील व इतर गटातील जमीनींचे व्यवहार तपासले असता त्याचे खाजगी बाजारी मुल्य अंदाजे ५०,००,०००००/ (अक्षरी पन्नास कोटी रूपये) पेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.तसेच सदर जमीन विक्री बाबतचे कारखाना प्रशासनाने घेतलेले काही ठराव हे संशयास्पद दिसून येत आहेत.वरील नमुद मुद्यांवर मे.साहेबांनी महसुल,सहकार,पोलीस,लेखापरीक्षण या विभागातील वरिष्ठ अधिका-यांची शासकीय समिती नेमून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन,व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याया विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आक्रमक आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

जमीन विक्रीबाबत ऊस उत्पादक सभासद,शेतकरी व कामगारांच्या मनात संशय

अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि.अंबासाखर ता. अंबाजोगाई (जि.बीड) यांचे मालकीचे गट नं ४०/२ मधील २५ एकर बेकायदेशीर जमीन विक्री प्रकरणी व कागदोपत्री दर्शविण्यात आलेल्या चुकीच्या मुल्यांकना बाबत तसेच कार्यकारी मंडळाच्या ठरावा बाबत ऊस उत्पादक सभासद,शेतकरी व कामगारांच्या मनात संशय आहे.सदर जमीन विकी बाबतचे कारखाना प्रशासनाने घेतलेले काही ठराव संशयास्पद दिसून येत आहेत.त्यामुळे सखोल चौकशी करून सदर जमिनी विक्री रद्द करून या प्रकरणातील दोषींवर अफरातफर केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा