Subscribe Us

header ads

अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

बीड(प्रतिनिधी)-बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपी अब्दुल रहमान उर्फ एरार नवाब हाश्मी यास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दि. २४ सप्टेंबर २०२१ रोजी ठोठावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.मंजुषा दराडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, बीड येथे राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीने दि. ११ मे २०१८ रोजी पोलिस ठाणे शिवाजीनगर येथे आरोपी अब्दुल रहमान उर्फ एरार याने सकाळी लाईफ लाईन हॉस्पीटल जवळ तिचा विनयभंग करुन तिला मारहाण केली अशा आशयाची फिर्याद मुलीने दिली होती. सदर मुलीच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी अब्दुल रहमान उर्फ एरार याचे विरुध्द भारतीय दंड विधान संहिता कलम ३५४, ३२४ व पोक्सो कायद्याचे कलम-१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
तपासाअंती पोलिसांनी सदर आरोपीविरुध्द बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी पिडीत मुलीसह एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने सादर केलेल्या भक्कम पुराव्याचे आधारे व विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मंजुषा दराडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एच.एस.महाजन यांनी आरोपी अब्दुल रहमान उर्फ एरार यास पोक्सो कायद्याचे कलम ७ व ८ अंतर्गत तसेच भादवि ३२३ अंतर्गत दोषी धरुन त्यास पोक्सो कायद्याचे कलम ७ व ८अंतर्गत पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच भादंवि ३२३ अंतर्गत एक वर्ष शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून आर.ए.शेख, जी.एस.कोलते यांनी आरोपीविरुध्द गुन्ह्याचा तपास केला व शासनातर्फे न्यायालयात विशेष सरकारी वकील अ‍ॅड.मंजुषा एम.दराडे यांनी शासनाची बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून श्री इंगळे व पोलिस शिपाई नागरगोजे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा