Subscribe Us

header ads

बीड शहरातील बायपास टू बायपास रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी प्रोजेक्ट डायरेक्टर काळेंसोबत केली पाहणी

बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातून जाणारा बायपास टू बायपास रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यापासून ते प्रशासकीय अधिकार्‍यांपर्यंत काम सुरू होण्यासाठी आ.संदिप क्षीरसागर यांचा पाठपुरावा सुरू आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्याने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी प्रोजेक्ट डायरेक्टर काळे यांच्यासोबत रस्ता काम सुरू होण्या अगोदर प्रत्यक्ष पाहणी केली.
मंगळवार दि.14 सप्टेंबर रोजी आ.संदिप भैय्या क्षीरसागर, नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर काळे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांच्यासह पदाधिकारी व नॅशनल हायवेच्या कर्मचार्‍यांनी बीड शहरातून जाणार्‍या जिरेवाडी, रामनगर, जालना रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी नाका ते कोल्हारवाडी  फाटा बायपासपर्यंत रस्ता कामाची पाहणी केली. लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. या अंतर्गत नाल्या व इतर सुविधा तसेच नागरिकांच्या अडचणी यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर, प्रोजेक्ट डायरेक्टर काळे यांनी समजून घेतल्या. गेल्या अनेक वर्षापासून सदरील रस्त्याचे काम प्रलंबित आहे. लवकरच आता या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने बीडकरांची मोठे डोके दु:खी कायमची बंद होणार आहे. हे रस्ता काम झाल्यानंतर शहरातील व शहरात येणार्‍या वाहनधारकांना, नागरिकांना मोठी मदत होईल. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने हे काम पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा