Subscribe Us

header ads

वाडी,वस्तीवर जात आ.संदिप क्षीरसागरांनी साधला नागरिकांशी संवाद खरगवाडी, भानकवाडी, धनगरवाडी, टाकळवाडी येथील विविध विकास कामाचे भूमिपुजन

बीड (प्रतिनिधी):- रायमोहा परिसरातल्या 12 वाड्यांचा विकास झाला नाही, रस्त्यांसह मुलभूत प्रश्न सुटलेले नाहीत, गेल्या 25 वर्षाच्या काळात जी विकास कामे झाली नाहीत ती विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशिल राहिल अशी ग्वाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली. खरगवाडी, भानकवाडी, धनगरवाडी, टाकळवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधत असतांना ते बोलत होते.आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी बीड विधानसभा क्षेत्रातील शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरातील खरगवाडी, भानकवाडी, धनगरवाडी, टाकळवाडी, रौंधवस्ती येथे भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गजानन कारखान्याचे चेअरमन रविंद्र दादा क्षीरसागर, रायमोहा जिल्हा परिषद गटाचे माजी जि.प.सदस्य मदन जाधव, पंचायत समिती सदस्य माऊली सानप, रामदास हंगे, रायमोहाचे माजी सरपंच शेख हशीम, प्रदिप सानप, अविनाश सानप आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत खरगवाडी येथे सौर पथ दिवे, गावांतर्गत सिमेंट रस्ता, सभामंडपाचे भूमिपुजन व इतर अशा एकूण 14 लक्ष, भानकवाडी खालची,वरची येथे सौरपथदिवे व दोन्ही ठिकाणी सभागृह अशा एकूण 19 लक्ष, धनगरवाडी येथे सौर पथ दिवे व रौंधवस्ती येथे रस्ता सुधारणा अशा एकूण 26 लक्ष, टाकळवाडी येथे सौर पथ दिवे 13 लक्ष रूपये अशा एकूण 72 लक्ष रूपयांच्या विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलत असतांना आ.संदिप क्षीरसागर म्हणाले की, गेल्या 25 वर्षाच्या विकास कामाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. टप्प्याटप्याने या भागातील रस्त्यासह इतर मुलभूत प्रश्न प्राधान्याने मार्गी लावेल. आपल्याकडे येत असतांना कोणते ना कोणते तरी विकास काम घेवून येत आहे. ही कामे चांगली व दर्जेदार झाली पाहिजेत असे सांगत या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशिल राहिल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी खरगवाडी, भानकवाडी, धनगरवाडी, टाकळवाडी या गावातील नागरिकांची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा