Subscribe Us

header ads

कुक्कडगाव येथे मोठ्या उत्साहात महा गौरी लक्ष्मी पूजन संपन्न


उपसंपादक झाकीर भाई सय्यद.मो 9730352589

कुक्कडगावं प्रतिनिधी/कोरोना मुळे गेल्या वर्षापासून देशात कोणतेही सण साजरे करण्यात येत नाहीत देशातील सर्व नागरीक कोणताही  जमाव न करता सर्व सण आप  आपल्या घरताच साजरे करत आहेत.सध्या गणपती आणि जेष्ठगौरी  यांची स्थापना झाली आहे.खेड्या पाड्यातील नागरीकांनी सार्वजनिक गणपती न बसवता आप आपल्या घरातच गणपती बसवले आहेत.तसेच रविवारी ज्येष्ठ गौरी चे आवाहन करण्यात आले आहे. घरोघरी ज्येष्ठ गौरी ( लक्ष्मी ) बसवण्यात आल्या आहेत. हा सण कुक्कडगाव तालुका जिल्हा बीड येथे ज्येष्ठा कनिष्ठा महा गौरी पूजन महापर्व काळाच्या निमित्त आज घरोघरी महा गौरीचे महापूजा करण्यात आली तोच हा प्रसंग कुक्कडगांव येथील गाडे कुटुंबातील सर्व सदस्य मंडळींनी आपल्या घरी अतिशय उत्साहात आनंदा मध्ये महागौरी लक्ष्मीदेवीचे पूजन करून मिष्ट अन्नाचा पुरणपोळीचा महालक्ष्मी गौरी देवीला नैवेद्य अर्पण करून सर्व कुटुंबाने महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि यावेळी सर्व कुक्कडगांव परिसरामध्ये तसेच गाडे कुटुंबामध्ये अतिशय आनंदाचे वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा