Subscribe Us

header ads

वंचितची मागणी,ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा..

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
बीड प्रतिनिधी /दि.८ गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यात गेली चार ते पास दिवसापासून सतत मुसळधार पाऊस होत आहे सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे खरिपाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हात तोडांशी आलेले सोयाबीन, मुग, उडीद, मका,बाजरी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कपाशी, तुरी सारखे पिक पिवळी पडली आहेत त्यामुळे शेतकर्यांचे पिक हातामधून निघून गेले आहे तसेच पावसामुळे पिक पाण्यात गेली आहेत घराच्या भिंती पडल्या आहेत जनावरांच्या गोठ्याच्या भिंती ढासळल्या आहेत त्यामुळे शेतकरी व नुकसानग्रस्त सर्वसामान्यांना पंचनामे न करता तातडीची मदत जाहीर करण्यात यावी व सर्व  गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने तहसिलदार खाडे यांना निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते पप्पू गायकवाड, माजी सरपंच उद्धव खाडे, किशोर भोले , पाटील रंजित नाकाडे,रेवन गायकवाड, रांजेद्र आर्सुळ, शरद खापरे, अजय खरात, युसूफ शेख, बाळासाहेब मुळीक, ईसाक पठान,विठ्ठल राऊत, मुबारक पठान,मुन्ना पहाडमुखेसह वंचितचे पदाधिकारी व कार्येकर्ते आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा