Subscribe Us

header ads

तिघींना सर्पदंश!, दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू, आईवर उपचार सुरु

केज-: केज तालुक्यातील सोनेसांगवी नं. २ येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबातील दोन मुली व आईला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याने दोन्ही मुली दगावल्या असून आईवर उपचार सुरू आहेत.
या बाबतची माहिती अशी की, ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२:३० वाजण्याच्या दरम्यान सोनेसांगवी नं. २ (ता. केज) येथील दीपक साखरे यांच्या कुटुंबातील सौ. जयश्री दीपक साखरे (वय ३० वर्ष), कु. स्वप्नाली दीपक साखरे (वय ४ वर्ष), कु. स्वीटी दीपक साखरे वय (३ वर्ष) या तिघी मायलेकींना त्यांच्या घरात झोपलेल्या असताना विषारी साप चावला. त्यात स्वप्नाली साखरे व स्वीटी साखरे या दोन्ही चिमुकल्या जागीच गतप्राण झाल्या.
तर त्यांची आई सौ. जयश्री साखरे यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामाननंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा