Subscribe Us

header ads

धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री, सामाजिक न्यायमंत्री कार्यकाळात बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त महिला अन्याय, अत्याचारात वाढ -- प्रा. जोगेंद्र कवाडे

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

बीड (प्रतिनिधी) पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्रजी कवाडे नगर, पाथर्डी मार्गे परभणी येथील कार्यक्रमासाठी जात असताना बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.शिरूर तालुक्यातील मातुरी, निमगाव, मायबा, तितरवणी तसेच गेवराई तालुक्यातील सिंगारवाडी फाटा , सावरगाव , मादळमोही , पाडळशिंगी, गढी याठिकाणी रात्री 11 च्या पुढे तोफा वाजवून पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे , प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले उपस्थित होते. यावेळी पत्रकाराशी बोलताना प्रा. जोगेंद्रजी कवाडे यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्रात सर्वात जास्त महिला अन्याय अत्याचार वाढ बीड जिल्ह्यात झालेली आहे.  ही अतिशय गंभीर व खेदजनक बाब आहे.धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तसेच महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आहेत. तरी त्यांच्या कार्यकाळात अशा प्रकारच्या महिला अन्याय अत्याचाराच्या गंभीर घटना घडत आहेत. याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला आहे. पुढे बोलताना म्हणाले.बार्टी ही संस्था बंद पडण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून आल्यावर धनंजय मुंडे यांनी नव्वद कोटी रुपयांचा निधी बार्टीला दिला. 
पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. परंतु आमचा धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात विश्वासघात केला आहे. जिल्हास्थरीय समिती, तालुकास्थरीय समितीत आमच्या पक्षाच्या पदाधिकारी यांना सामावून घेतले नाही.यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांनी बोलताना सांगीतले की धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात समाजकल्याणच्या अनेक योजना बंद पडत आहेत. परळी येथे करुणा शर्मा यांना अडकवण्यासाठी खोट्या अट्रोसिटीचा वापर करून अट्रोसिटी कायदा बदनाम केला आहे. याप्रकरणी उच्चस्थरीय समिती नेमण्यात यावी. अकार्यक्षम सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात येथून पुढे महाराष्ट्रात पीपल्स रिपब्लिकन आंदोलन करणार आहे असे जाहीर केले. यावेळी त्यांच्या सोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा सचिव अनिल तुरूकमारे, गेवराई तालुका उपअध्यक्ष विष्णू मारोती खेडकर, तालुका सचिव नामदेव इनकर इत्यादी. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा