Subscribe Us

header ads

बीड शहरात आवश्यक ठिकाणी नगरपरिषदने बस स्थानके उभी करावीत - प्रा. ज्ञानेश्वर राऊत

 बीड प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

बीड (प्रतिनिधी)- बीड शहरात विविध ठिकाणी प्रवासी वाहनांची वाट पाहताना उभी असल्याचं  चित्र कित्येक वर्षापासून पहायला मिळत आहे. परंतु निष्क्रिय नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ही बाब खेदजनक आहे. प्रत्येक शहरात विविध ठिकाणी बस थांबत असते तिथे वाट बघत बसणार या प्रवाशांना तेथील स्थानिक प्रशासनाने बस स्थानकांच्या सुविधा दिलेल्या असतात. परंतु बीड शहरात असंख्य ठिकाणी शाळकरी मुले,मुली  महाविद्यालयीन मुले,मुली महिला,पुरुष,अबालवृद्ध, गरोदर माता रूग्न बस ची वाट पाहत रस्त्यावर तासंतास उभे असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यांना ऊन,वारा व पाऊस यापासून संरक्षण मिळावे.  यासाठी शहरात आवश्यक ठिकाणी जसे की, नगर नाका, बालेपिर, मोंढा नाका, बार्शी नाका, शिवराज पान सेंटर चौक, तेलगाव नाका वइतर काही आवश्यक ठिकाणी नगरपरिषदेने बस स्थानक उभी करावीत.ही नम्र विनंती. या आशयाचे निवेदन आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटनमंत्री कवि,प्रा.ज्ञानेश्वर (आण्णा)राऊत यांनी जिल्हाधिकारी यांना दिली व संबंधित निवेदनाची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा