Subscribe Us

header ads

संशयातून पारध्याचे किती बळी घेणार आहात?:-पँथर दिपक केदार


अंमळनेर_ चोरीच्या आरोपातून पाटोदा तालुक्यातील पारनेर येथील पारधी वस्तीवर हल्ला करून एक वर्षाचा मुलगा ठार व एक वयोवृद्ध ठार केला तर 8 ते 10 जण जखमी केले हि घटना मानवतेला काळिमा फासणारी घटना दि.२५ सप्टेंबर शनिवार मध्यरात्री घडली.याबाबतीत ऑल इंडिया पँथर सेनेचे स्थापक अध्यक्ष दिपक भाई केदार यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेतली.व याबाबतीत पाटोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांची भेट घेऊन या जातीयवादी आरोपींना कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की"शंका आली मारा पारधी"अशी अवस्था महाराष्ट्रातल्या जातीय मानसिकतेची झाली आहे.ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा जाहीर निषेध करत आहे. पारधी समूहाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही जमात नकोशी वाटायला लागली आहे. सरकारने कसलंही धोरण यांच्यासाठी बनवले नाही, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा दिला नाही. शिक्षणापासून वंचित ठेवले, न्यायापासून वंचित ठेवले. जातीय मानसिकतेच्या व्यवस्थेने त्यांची कायम दुर्दशा केली. महापुरुषांच्या रयतेच्या महाराष्ट्रात पारधी समूहाला जाणीवपूर्वक सुनियोजितपणे वंचित ठेवण्यात आले.पारनेर पारधी हत्याकांड घटना गंभीर आहे. सर्व आरोपींना अटक करून 302 अंतर्गत अट्रोसिटी अंतर्गत कार्यवाही करावी, तात्काळ पीडितांना 20 लाखांची मदत करावी, पारधी वस्तीला तात्काळ संरक्षण द्यावे, 2 वर्षाच्या मुलाची हत्या ही क्रूर हत्या म्हणून घोषित करून मॉब लिंचिंग प्रकरण असल्याचे त्या अनुषंगाने कार्यवाही करावी. महाराष्ट्रातला पारधी सुरक्षित नाही तात्काळ संरक्षणाची भूमिका घ्यावी.या घटनेचा राज्यभर निषेध करणार, पारधी समाजाच्या रक्षणासाठी ऑल इंडिया पँथर सेना मैदानात उतरणार आहे. "पारधी पँथर" उभा करणार.अशी आपली आक्रमक भूमिका व्यक्त केले.यावेळी पँथर सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष नितीन सोनवणे,पाटोदा ता.अध्यक्ष चेतन जावळे पँथर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, भिम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा