Subscribe Us

header ads

बीड तालुक्यातील गेवराई मतदार संघातील गावाचा विकास हरवला!

प्रतिनिधी. नवनाथ गोरे
🌀🌀🌀🌀🌀🌀


वाकनाथपुर प्रतिनिधी_ बीड तालुक्यातील बरेचसे गावे गेवराई मतदार संघात येतात तालुका बीड  आणि मतदार संघ गेवराई आल्याने ही गावचा विकास कोणीच करत नाही.या मतदार संघातील कोणत्याही गावाला नीट रस्ता नाही डांबरी रस्ताचे रूपांतर पांदन रस्त्यात झाले आहे कुर्ला ते कुक्कडगाव या रस्त्याने यस टी बस सेवा सुरु होती आता त्या रस्त्याने मोटारसायकल ही जात नाही. एक ते दीड वर्ष झाले बीड ते भाटसांगवी .कुक्कडगाव बस सेव बंद आहे.त्या कारणाने नागरिकांचे खूप हाल होत आहेत.भाटसांगवी ते राक्षसभुवन हा पुल वाहून जाऊन एक महिना झाला तरी पुल जसास तसा आहे. आश्वासने भरपूर दिले पण काम मात्र शुन्य आहे वाकनाथपुर ते म्हाळस जवळा हा 5 कि मी चा रस्ता गेले दोन वर्ष झाले मुरूम आणि खडी टाकून बंद केला आहे. आणि कार्यकर्ते ओरडतात रस्ता यांनी दिला त्यांनी दिला पण काम कधी पूर्ण होणार याचं रस्तावर म्हाळस  जवळा येथील जिल्हा परिषद शाळा येथील पुलावरून पाणी  नीट रोड वरून  वाहत असल्याने मुरूम आणि खडी वाहून चालली आहे. आणि डांबरीकरण झाल्यावर हा रास्ता कसा राहणार   टुक्कडमोडी  नदीवरती पुल नसल्याने नदीला पाणी आल्यावर वाकनाथपुर येतील नागरिकांचे  अतोनात हाल होत आहेत. अनेक वर्षापासून या नागरिकांचे मागणे असुन देखील आश्वासना शिवाय यांना काही मिळाले नाही. निवडून कोणीही आले तरी या मतदार संघातील विकास कोणी करत नाही मतदान जवळ आले की सर्व उमेदवार आश्वासने देतात आणि निवडून आले की पाच वर्षे शिंदफाना नदी च्या अलीकडे कोणी येत नाही आणि कार्यकर्ते मात्र पाच वर्ष जोमात राहतात बीड तालुक्यातील गेवराई मतदान संघातील या गावाचा विकास जर असाच राहिला तर काही दिवसाने पाऊसळ्यात या सर्व गावातून बाहेर ही निघता येणार नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा