Subscribe Us

header ads

महिलेस अडवून पैश्याची मागणी करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करावी – आशिषकुमार चव्हाण

बीड प्रतिनिधी/दि.१४ मौजे कोरेगाव ता.केज येथे श्रीराम तुकाराम तांदळे. रा. कोरेगाव ता. केज व इतर दोन जणांनी समाजसेविका व नवचेतणा विकास केंद्र व सामाजिक संस्थेच्या सचिव मनीषा सीताराम घुले, ज्योति कपिल साखरे, कौशल्या चंद्रकांत थोरात यांच्या गाडीला मोटार सायकल आडवी लाऊन व चाकूचा धाक दाखऊन दोन लाख रुपये दे व कोर्टातून पाठवलेली नोटिस माघारी घे नसता तुला जीव मारेल अशी धमकी दिली आहे, अशी तक्रार केज पोलिस स्टेशन मध्ये दाखल केली असून वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात आमच्या संघटणे मार्फत निवेदन देत आहोत. तरी प्रशासनाने आरोपीस तात्काळ अटक करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी चे जिल्हाध्यक्ष आशिषकुमार चव्हाण यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात महिला अन्याय अत्याचाराच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलावीत अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्यात येईल इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा