Subscribe Us

header ads

दोन जीपची समोरा समोर जोराची धडक दोन जागीच ठार

बीड_दोन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन दवाखान्यात निघालेल्या जीपला मालवाहू जीपने समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दीर- भावजय जागीच ठार झाले तर दोन वर्षांच्या बाळासह त्याचे वडील बालंबाल बचावले.बीड-परळी मार्गावरील जरूड फाट्यावर १४ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.रवि नागोराव मिटकर (२६), सोनाली माधव मिटकर (३०) अशी मयत दीर- भावजयीची नावे आहेत. चालक विशाल अर्जुन मिटकर (२७) हा जखमी असून गौरव माधव मिटकर (२) आणि माधव नागोराव मिटकर (३५) हे थोडक्यात वाचले. घाटसावळी तांडा (ता.बीड) येथील रहिवासी असलेल्या मिटकर कुटुंबातील गौरवला रात्री ताप आला. त्यामुळे पहाटे ३ वाजता त्याला घेऊन कुटुंबीय बीडकडे जीपमधून (एमएच ०६ एएस – ०४६७) बीडला निघाले होते तर भूम (जि. उस्मानाबाद) येथून परळीकडे भाजीपाला घेऊन मालवाहू जीप (एमएच २५ एजे- ३४०३) जात होती.बीड- परळी मार्गावर जरूड फाट्यानजीक मालवाहू जीपचालकाचा ताबा सुटला आणि समोरासमोर जोराची धडक झाली.यानंतर जीप शंभर दीडशे मीटरवर जाऊन उलटली. यात रवि मिटकर व सोनाली मिटकर हे जागीच मृत्युमुखी पडले तर चालक अर्जुन मिटकर हा जखमी झाला. गौरव आणि त्याचे वडील माधव हे अपघातानंतर जीपमधून बाहेर झेपावले. त्यामुळे ते सुरक्षित आहेत. अपघातात जीपचा अक्षरशः चुराडा झाला असून मालवाहू जीपचे देखील नुकसान झाले. पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा