Subscribe Us

header ads

करुणा शर्मांच्या जामिनावर १८ सप्टेंबरला होणार सुनावणी

अंबाजोगाई/ मंत्री धनंजय मुंडेंविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीला आलेल्या आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्हयात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांच्या जामिन अर्जावर सुनावणीसाठी तारिख देण्यात आली होती . मात्र ज्या न्यायालयासमोर ही सुनावणी होणार होती ते न्यायालय रजेवर असल्याने या प्रकरणात पुढील सुनावणी शनिवार (दि. १८ ) रोजी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करत करुणा शर्मा उर्फ करुणा मुंडे परळीत आल्या होत्या. मात्र याठिकाणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात त्यांना अटक झाल्याने त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.करुणा शर्मा यांनी अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी मंगळवारी ( दि. १४) होणार होती. मात्र ज्या अति. जिल्हा सत्र न्यायाधिश श्रीमती एस.एस. सापटणेकर रजेवर असल्याणे जामिण अर्जावर आता शनिवारी सुनावणी होणार असल्याणे करुणा शर्मा (मुंडे) यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा