Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वतीने दिव्यांगांना मोफत मोटाराईज्ड ट्रायसिसायकल दिले जाणार तपासणी शिबीराचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ; गरजुवंतांनी लाभ घेण्याचे आवाहन

बीड (प्रतिनिधी):- आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वतीने बीड विधानसभा क्षेत्रातील 80 टक्केहून अधिक दिव्यांग असलेल्या दिव्यांगांना मोफत मोटराईज्ड ट्रायसिसायकल दिली जाणार आहे. त्यासाठी आयोजित नोंदणी व तपासणी शिबीराची सुरूवात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. गरजुवंतांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वतीने दिव्यांगांना मोटराईज्ड ट्रायसिसायकल वाटपासाठी अस्थिव्यंग असलेल्या दिव्यांगासाठी दि.28 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत नोंदणी शिबीराचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत दिव्यांग आपली नोंदणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बार्शी रोड येथे संजय देवकर मो.8766806662, राष्ट्रवादी अपंग सेलचे अध्यक्ष श्रीराम घुमरे मो.9518947652  करू शकणार आहेत. तपासणीसाठी दिव्यांग प्रमाणपत्राची सत्यप्रत, आधारकार्ड, रेशनकार्ड, डीआरडी प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रासह नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तपासणी शिबीर झाल्यानंतर ज्याचे दिव्यांगाचे प्रमाण 80 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा दिव्यांगांना मोटराईज्ड ट्रायसिसायकल वाटप केली जाणार आहे. याचा बीड विधानसभा क्षेत्रातील दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा