Subscribe Us

header ads

आज वाकनाथपुर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी नवनाथ गोरे मो 9823310880


वाकनाथपुर प्रतिनिधी/वाकनाथपुर येथे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दीन हा  उत्साहात साजरा करण्यात आला
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत  स्वातंत्र्य झाला पन त्या वेळी देश हा अनेक संस्थानामध्ये विखुरलेला होता त्या पैकी ५६५ पैकी  ५६२ संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली मात्र हैदराबाद संस्थान जम्मू आणि काश्मीर .जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती हैदराबाद संस्थांनावर निजाम मिरा उस्मान अली खान  यांचे राज्य होते हैदराबाद संस्थानावर सहा पिढ्या पासून निजाम वंशाचे राज्य होते हैदराबाद संस्थानांमध्ये तेलंगणा .मराठवाडा. कर्नाटकचा काही भाग होता  मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजाम सरकारने रजाकार नावाने स्वयंसेवकांची भरती केली आणि निजाम सरकारने मराठवाड्यातील जनतेवर अधिकच अन्याय अत्याचार सुरु केले निजाम सरकारच्या अन्यायाच्या विरोधात शुर विर हुतात्मे पुढे सरसावले आणि निजाम सरकारला शरणागती पत्करण्यास भाग पाडले आणि १७ सप्टेंबर १९४८ माराठवड्याला निजामापासून मुक्त केलेतेव्हापासून १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दीन म्हणून साजरा केला जातो आज वाकनाथपुर येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी , एपीजे अब्दुल कलाम,  यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून राष्ट्रीय ध्वज  फडकावून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला त्यावेळी शाळेचे मराठी माध्यमचे मुख्याध्यापक नविद सर, उर्दू माध्यमचे  मुख्याध्यापक जलील सर, गावडे सर, कलीम सर, ग्राम सेवक पवळ साहेब,सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा