Subscribe Us

header ads

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार; खा. प्रितम मुंडे

गेवराई प्रतिनिधी :- जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीचा सामना करत असताना काही भागांमध्ये पूर,तर काही भागात तलाव फुटण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.यामुळे पिकांची हानी,घरांची पडझड आणि शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टी, पूर आणि तलाव फुटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी तिहेरी संकटाला तोंड देत आहेत.या नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना दिला.गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी आणि जातेगाव येथील तलाव फुटल्यामुळे या परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून खा.प्रितम मुंडे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी आ.लक्ष्मण अण्णा पवार यांच्यासह त्यांनीशेती, फळबागा,आणि पडझड झालेल्या घरांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.जर राज्यातील सरकारने मदत देताना हात आखडते घेतले तर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मदत मिळवू असा विश्वास खा.प्रितमताई मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा