Subscribe Us

header ads

बालविवाह प्रतिबंधक कायदा अंमलबजावणी शिबिर शिरूरकासार येथे संपन्न

                  

बीड प्रतिनिधी -  केंद्रीय महिला व बाल कल्याण विभाग चाईल्ड लाईन बीड व तालुका विधी सेवा समिती शिरूर कासार यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंधक कायदा अंमलबजावणी प्रशिक्षण ग्रामविकास अधिकारी, पोलिस यांची जबाबदारी ग्राम बाल संरक्षण समिती स्थापना व सक्षमीकरण व कायदेविषयक जनजागरण शिबीर तहसील कार्यालय शिरूर कासार येथे मा. अमितकुमार मनगिरे साहेब दिवानी न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा समिती शिरूर कासार, मा. श्रीरामजी बेंडे साहेब तहसीलदार शिरूर कासार, मा. महादेव जायभाये साहेब गटविकास अधिकारी शिरूर कासार, मा.श्री बाजीराव ढाकणे बीड जिल्हा समन्वयक लेक लाडकी अभियान ,मा. श्री ओम गिरी बालकामगार प्रकल्प अधिकारी चाईल्ड लाईन बीड, मा. सिद्धार्थ  माने पो. नि. शिरूर  मा.Ad. आर.एम.नागरगोजे साहेब अ. वकील संघ शिरूर, मा. समीर पठाण सदस्य विधी सेवा समिती शिरूर,  मा. श्रीमती सोनिया हांगे मॅडम युनिसेफ एसबीसी 3 बीड, मा. अतुल कुलकर्णी सर जिल्हा समन्वयक चाइल्ड लाईन बीड, मा. रामहरी जाधव सर बीड, तसेच शिरूर कासार तालुक्‍यातील सर्व ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत पार पडले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात थाटामाटात झाली; त्यानंतर मान्यवरांचे स्वागत झालं. प्रास्ताविके मध्ये कार्यक्रमाची रूपरेषा, उद्दिष्ट आणि ध्येय याबाबत सविस्तर माहिती अतुल कुलकर्णी साहेब यांनी देत प्रशिक्षण शिबिराचा हेतू  सर्वांसमोर ठेवला.  श्री बाजीराव ढाकणे बीड जिल्हा समन्वयक, लेक लाडकी अभियान यांनी ग्राम बाल संरक्षण समिती रचना व समितीचे कार्ये कर्तव्य व जबाबदारी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बालविवाह होण्याची कारणे व ते थांबण्याविषयीची कोणाकोणाची काय काय जबाबदारी या विषयावर चर्चा केली,ओम  गिरी सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाल कामगार, बाल मजूर तयार होऊ न देन ही  समाजाची म्हणजे पर्यायान आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.कारण यामुळे उद्याची पिढी सक्षम पणे निर्माण होऊ शकते.ज्या देशातील तरुणांच्या ओठी जे गीत असत त्यावरच त्या देशाचं भवितव्य अवलंबून असतं असे सुंदर मार्गदर्शन करत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. मा. महादेव जायभाये साहेब बीडीओ पं.स. शिरूर कासार यांनी अधिकचे काम का करावे? काम करताना ते मनातून केले तर त्याची यशस्विता पटकन मिळते. बाल विवाह होण्याची कारणे कोणती आहेत. हे काम करताना निर्माण होणाऱ्या समस्या कशा सोडवायच्या ? काम आनंदाने कसे करावे? यावर सविस्तर मार्गदर्शन केले तर  शिरूर कासार तालुक्याचे  मा.   तहसिलदार साहेब यांनी काम करताना कान व डोळे उघडे ठेवून ते करा. पालकांशी संपर्क ठेवा.It is part of my duty  असे न मानता It is my duty या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी हे कार्य हाती घेऊन यशस्वी करा. Co operation खूप महत्त्वाचे आहे आणि मानवी संवेदना जाग्या ठेवून येणाऱ्या काळात आपल्याला कार्य करावे लागेल. योग्य वयात योग्य जाणीवा मुलांना निर्माण करून द्या. पब्लिक सायकॉलॉजी ओळखा आणि कार्य करा यश आपलंच असणार आहे. बालविवाह कसे थांबवावेत याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.  बाजीराव ढाकणे सर यांनी गाव पातळीवर बाल समिती कशी स्थापन करावी त्याची रूपरेषा व कार्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. युनिसेफ एस. बी. सी.3 च्या बीड प्रतिनिधी सन्माननीय सोनिया हंगे मॅडम यांनी  प्रोजेक्टरच्या माध्यमातून सुंदर सुंदर व्हिडिओ क्लिप दाखवत बाल विवाह कसे चुकीचे आहेत, त्यामुळे एका मुलीच्या आयुष्याबरोबर पुढच्या पिढीच ही  आपण नुकसान करत आहोत याबाबत व्यवस्थितपणे मार्गदर्शन केले. या क्षेत्रात जेव्हा मी माझ्या कार्याला सुरुवात केली होती त्यावेळी माझ्यासमोर आठ जिल्हे होते परंतु मी त्यापैकी बीड या जिल्ह्याची निवड केली कारण बीड ही माझी जन्मभूमी होती आणि इथेच मला उत्कृष्ट कार्य करायचे आहे हा विचारही त्यांनी व्यक्त केला. Ad.आर. एम. नागरगोजे यांनी बाल विवाह कसे रोखावे? याविषयीचे कायदे तसेच कायद्याच्या बाबतचे  मार्गदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली. मा.अमित कुमार मनगिरे दिवानी न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा समिती शिरूर कासार यांनी आपल्या मार्गदर्शनात कायद्या बद्दल माहिती देऊन आपण आपली कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजेत. कमी होणाऱ्या बाबींची उपयुक्तता लक्षात घेतली पाहिजे. कायदे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचली पाहिजेत. तुम्ही सर्वजण म्हणजे गावाचे पर्यायाने देशाचे पायाभूत घटक आहात म्हणूनच या कार्यासाठी तुमची निवड झालेली आहे आणि तुम्ही हे काम उत्कृष्टपणे कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोकन्यायालय हा उपक्रम  राबवला जात आहे त्यानुसार आपणही आपल्या तालुक्यात तो राबवला नि यामध्ये  बीड जिल्हयात प्रथम क्रमांकावर शिरूर तालुका राहिला याचा मला सार्थ अभिमान वाटतो. तुम्ही सर्वांनी लोक न्यायालया साठी सहकार्य करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करून अनेक प्रेरणादायी विचार प्रभावीपणे ऐकणाऱ्या च्या काळजात रूजवत सकारात्मक विचारांची ऊर्जा सर्वांना देत सर्व शिबिरार्थ्यांच्या मनात नवा उत्साह निर्माण करत हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सुंदर प्रयत्न  शिवचरित्रकार कैलास तुपे सर मानूर यांनी केला तर आभार प्रदर्शन समीर पठाण सदस्य विधी सेवा समिती शिरूर कासार यांनी केले. श्रीमती सारिका यादव समुपदेशक चाइल्ड लाईन बीड श्रीमती अश्विनी जगताप मॅडम, श्रीमती संगीता भराटे मॅडम, स्वप्निल कोकाटे सर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला.चाइल्ड लाईन चा लोगो असलेली आकर्षक रांगोळी कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा