Subscribe Us

header ads

पुर्ण ताकदीने बीड पालिका ताब्यात द्या,विकास कामातून शहराचा चेहरामोहरा बदलतो-आ.संदिप भैय्या क्षीरसागर; प्रभाग क्र.11 मध्ये 1 कोटी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- पोट निवडणूकीत जिल्ह्याची नजर बालेपीरच्या प्रभाग क्र.11 कडे लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपल्या उमेदवाराला ए.बी.फॉर्म मिळाल्याने विरोधकांनी पुर्ण ताकद लावली. काही करून उमेदवार पडला पाहिजे यासाठी खुप प्रयत्न झाले. परंतू या प्रभागातील जनतेचे आशिर्वाद आणि दुवाँ मिळाल्याने पोट निवडणूकीतील विजयाने आमदारकीचे तिकीट फायनल झाले. आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने आमदारही झालो. आता पुर्ण ताकदीने बीड नगर पालिका ताब्यात द्या, शहराचा विकासाच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलवतो. या कामांमध्ये खूप अडचणी आणल्या, कोणी कोर्टात गेले, कोणी अंधारातून काड्या केल्या परंतू आपले आशिर्वाद आणि दुवाँ सोबत असेल तर आपल्याला कोणी रोखू शकत नाही. गेल्या 25 वर्षात जी विकास कामे झाली नाहीत ती विकास कामे पुर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशिल राहिल अशी ग्वाही 

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली. बालेपीर भागातील प्रभाग क्र.11 मधील 1 कोटी रूपयांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.
गुरूवार दि.28 ऑक्टोबर रोजी बालेपीर भागातील प्रभाग क्र.11 तील रस्ता व नाली अशा 1 कोटी रूपयाच्या विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल, नगरसेवक मामु गुत्तेदार, रमेश चव्हाण, शेख मोहसीन, अ‍ॅड.प्रविण राख, यांच्यासह या भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी माजी आ.सय्यद सलीम म्हणाले की, पालिका सुविधा पुरविण्यात अकार्यक्षम आहे. पालिकेतील सत्ताधार्‍यांकडे इच्छाशक्ती नाही. आपण बॅकवॉटर सारखी मोठी योजना आणली, पाणी आहे परंतू पालिकेला शहरातील जनतेला चार दिवसाआड पाणी देता येत नाही. आ.संदिप भैय्या सरळ आणि साधे आहेत. त्यांच्या माध्यमातून विकास कामे होत आहेत. आता त्यांच्या विचाराची पालिका एकहाती द्या असे आवाहनही 

यावेळी त्यांनी केले. तर माजी आ.सुनिल धांडे म्हणाले की, जनतेचा प्रतिसाद पाहून आणि आ.संदिप भैय्यांच्या माध्यमातून सुरू असलेले कामे पाहून नगराध्यक्ष आणि माजी मंत्र्यांची झोप उडेल. विकास कामांचा धडाका भैय्यांच्या माध्यमातून सुरू आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले. यावेळी पुढे बोलतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, शहरातील बायपास टू बायपास रस्ताही पवार साहेब, गडकरी साहेब यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. बायपास टू बायपास रस्ता आणि बिंदूसरा नदीवरील पुलही लवकरच सुरू होईल. दहा-बारा वर्षापुर्वीची कामे पालिका आत्तापर्यंत करत आहे. खर तर त्यांना सुभाष रोड, जिल्हा रूग्णालय जवळचा रस्त्यावरील निधक्ष हडप करायचा होता. परंतू त्यांनी खाल्लेले रस्ते आपण करण्यास भाग पाडले. सेक्युलर विचार घेवून आपण लोकांपर्यंत गेलोत परंतू त्यांची भूमिका चोरासारखी असते. आमदारकीला एक, खासदारकीला एक यांच्यासोबत आता कोणी नाही. कोणती आघाडी त्याची पिछाडी झाली. आपल्यासमोर कोणी लढायलाच नाही हे दिशाभूल करण्यासाठी येतील त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. आर्धी नव्हे तर पुर्ण पालिका ताब्यात द्या, विश्वास देतो 25 वर्षात जो विकास झाला नाही ती विकास कामे पाच वर्षात पुर्ण करून दाखविल. आम्ही टाकलेल्या निधीत आडकाठी आणणार्‍यांना, ब्लॅकमेलींग करणार्‍यांना खड्यासारखं बाजुला काढा असे आवाहनही यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल, नगरसेवक मामु गुत्तेदार, मोहसीन मेंबर, यासेर चाऊस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्र.11 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेे.

महिला भगिनींना दिला मान,रस्त्याचे भूमिपुजन
प्रभाग क्र.11 मधील संत ज्ञानेश्वर नगरमध्ये रस्ता कामाचे उद्घाटन करण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे आले होते. स्थानिक नागरिकांनी आ.संदिप भैय्यांना तुम्हीच नारळ फोडा असा आग्रह धरला परंतू भैय्यांनी महिला भगिनींना सन्मान देत त्यांच्या हस्ते नारळ फोडून रस्ता कामाचा शुभारंभ केला. यावेळी हा सन्मान दिल्यानंतर महिला भगिनींनी आ.संदिप भैय्यांचे आभार मानले.


प्रत्यक्ष कामाला सुरूवात
प्रभाग क्र.11 मध्ये यापुर्वी अनेक वेळा विरोधकांनी नारळ फोडली परंतू काम सुरू झाले नाही. आत्ता मात्र आ.संदिप भैय्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाल्यानंतर लगेचच कामाला सुरूवात करण्यात आली आहे. आजपासून सर्व कामाच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली असून काम दर्जेदार आणि गुणवत्ता पुर्ण करण्याच्या सूचनाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा