Subscribe Us

header ads

बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये द्या---- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील (आप्पा )पवार

बीड स्पीड न्यूज 

(बीड स्पीड न्यूज) बार्शी तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पिकांचा आलेला घास पूर्णपणे वाया गेला आहे. शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे.त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत सरकारकडून मिळावी व शेतकरी आत्महत्या करण्यापासून वाचवावा.कुठलेही पंचनामे न करता सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना केल्याशिवाय शेतकरी पूर्वपदावर येणार नाही. म्हणून आपण ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्या विम्याची रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा करावी व बळीराजाला या अस्मानी संकटापासून वाचवावे. अशी मागणी वैराग येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील (आप्पा )पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदना द्वारे केली आहे.मुख्यमंत्री यांनी गेल्या दोन-तीन वर्षापासून अतिशय चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये केले आहे.परंतु निसर्गाच्या अवकृपेने अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. त्याकरिता आपण स्वतः आपले प्रतिनिधी किंवा आपण स्वतः येऊन बार्शी तालुक्याची परिस्थिती पहावी व सरसकट सर्व शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत त्वरित मिळावीबार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टी जाहीर करून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयाची रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर ती द्यावी त्याशिवाय शेतकरी त्याच्यातून बाहेर पडणार नाही. गुरेढोरे घरे पडले आहेत.शेतकऱ्यांची अतिशय भयानक परिस्थिती या गुलाबी वादळाने तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे.सर्व मध्यम प्रकल्प मोठे प्रकल्प नद्या-नाल्या भरून वाहत आहेत.त्यामुळे लोकांना रानात जाऊन पंचनामा करायला सुद्धा कमी चान्स आहे. आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला त्वरित मदत मिळावी. अशी मागणी वैराग येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील (आप्पा )पवार यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा