Subscribe Us

header ads

बीड समाज कल्याण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा स्पष्ट अभिप्राय जिल्हा वार्षिक योजनामध्ये अपहार ; प्रकरणी केली होती तक्रार

बीड (प्रतिनिधी) प्रतीक नवनाथ सरवदे यांनी समाज कल्याण आयुक्त पुणे व प्रादेशिक उपायुक्त औरंगाबाद यांना दिनांक ०४.सप्टेंबर २०१९च्या तक्रारीद्वारे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड तसेच इतर अधिकारी-कर्मचारी यांनी जिल्हा वार्षिक योजनामध्ये अपहार केल्याची तक्रार दाखल केली होती. अजय उर्फ प्रतिक सरवदे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी दिनांक २ नोव्हेंबर २०१९ च्या पत्राद्वारे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग औरंगाबाद यांना सदरील प्रकरणाची चौकशी करून चौकशी अहवाल कार्यवाहीच्या शिफारशीसह आयुक्तालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रादेशिक उपायुक्त, औरंगाबाद यांनी सखोल चौकशी करून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांनी वित्त विभाग, शासन निर्णयांचे व खरेदी प्रक्रियेचे अचूक पालन न करता खरेदी केल्याचे स्पष्ट होत असून प्रथम दृष्ट्या ते दोषी आढळून येत असल्याने विभागीय चौकशी करण्याबाबत मा.आयुक्त पुणे यांना शिफारस केली होती. चौकशी समितीच्या शिफारसीनुसार आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मा. प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांना दिनांक १८ नोव्हेंबर २०२० रोजी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करून एकत्रित विभागीय चौकशी करणे बाबत शिफारस केली होती तसेच असे न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी हे शासकीय कागदपत्रांमध्ये खोडतोड व गहाळ होऊन ते पुरावे नष्ट करण्याची दाट शक्यता आहे असा अभिप्राय नोंदवला होता.दि.१८ नोव्हेंम्बर २०२० च्या पत्रांमध्ये विभागीय चौकशी करून अधिकारी वकर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा स्पष्ट अभिप्राय असताना देखील शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही कुठलीही कार्यवाही होताना दिसून येत नसल्यामुळे प्रतिक उर्फ अजय सरवदे यांनी मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अँड.महेंद्र पंडितराव गंडले यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली होती व सदरील अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली होती. याचिकेवर सुनावणी होऊन मा.उच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. प्रतिक नवनाथ सरवदे उर्फ अजय सरवदे यांच्यावतीने अॅड.महेंद्र पंडितराव गंडले हे काम पाहत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा