Subscribe Us

header ads

खदानीत बुडून दोन बालकाचा मृत्यू

केज_खदानी मध्ये बुडून दोन  बालकांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली असून ही घटना साळेगाव शिवारातील दस्तगीर माळ येथे घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत अनिल बबन शिंदे व प्रकाश बबन शिंदे (रा.चिंचोली माळी) असे बुडून मृत्यू पावलेल्या भावंडांची नावे आहेत. दोघांचे वय दहाच्या जवळ आहे. सदरील बालके नेमके त्या ठिकाणी का गेले होते? घटना नेमकी कशी घडली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, प्रमोद यादव, पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, अशोक नामदास, धन्यपाल लोखंडे, शिवाजी शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खदाणीतून बालकांचे मृतदेह बाहेर काढून केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा