Subscribe Us

header ads

कंपनीमध्ये पाण्याचा टँकर पुरविण्याचे कारणावरुन खुन करुन ५ महिन्यापासुन फरार असलेल्या आरोपीला महाळुगे पोलीसांनी बीड मधून केला अटक

पिंपरी चिंचवड : कंपनीमध्ये पाण्याचा टँकर पुरविण्याचे कारणावरुन खुन करुन ५ महिन्यापासुन फरार असलेल्या आरोपीला महाळुगे पोलीसांनी बीड मधून अटक केली आहे.सौरभ विद्यासागर सोनवणे (वय २१) वर्ष, रा. च-हाटा, ता.जि.बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यात आत्तापर्यंत संतोष मधुकर मांजरे (वय ३०, रा-कोरेगाव खुर्द, ता खेड जि पुणे), अक्षय अशोक शिवळे (वय २५ वर्ष, रा- महाळुगे, ता खेड जि पुणे),दिपक बाळु पिंजन (वय २५ वर्ष, रा- महाळुगे, ता-खेड,पुणे), वैभव उर्फ सोन्या अरुण खोंडगे (वय २२ वर्ष, रा महाळुगे, ता खेड जि पुणे),गौरव गजानन मुळे (वय २३ वर्ष रा-महाळुगे, ता-खेड, पुणे), विनोद उर्फ सोन्या गणेश पवार (वय १९ वर्ष, रा शेलु ता खेड जि पुणे), आकाश उर्फ गणेश रवी उर्फ रविंद्र धर्माळे (वय १९ वर्ष, रा-महाळुगे, ता-खेड, पुणे), ऋषिकेश उर्फ गोटया सुनिल भालेराव (वय २० वर्ष, रा-बौध्दवस्ती, महाळुगे, ता खेड जि पुणे),  अभिषेक बुध्दसेन पांडे (वय १९ वर्ष, रा-अंकुश पवार यांचे खोलीमध्ये खालुंब्रे, ता खेड जि पुणे), अनिल शांताराम शिंदे (वय २२ वर्ष, रा-आडे, पोस्ट- आंबोली, ता खेड जि पुणे),ऋषिकेश बाळु रोकडे (रा-भांबोली, ता-खेड जि-पुणे) या ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अतुल तानाजी भोसले (वय २६ वर्ष) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.आय.डी.सी.मधील कंपन्यांना पाण्याचे टॅकर पुरविण्याचे कारणावरुन महाळुगे येथील अतुल तानाजी भोसले याचा कुख्यात गुंड संतोष मांजरे व त्याच्या साथीदाराने महाळुगे गावचे हद्दीत चाकण तळेगाव दाभाडे रोडलगत रेणुका हॉटेल समोर कोयत्याने वार करुन खुन केला होता.सदर घटनेच्या संदर्भाने चाकण पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.कलम-३०२, १४३, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल असुन त्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम (मोक्का) कायदयाचे कलमांची वाढ केली आहे.सदर गुन्हयामध्ये आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आरोपी सौरभ सोनवणे हा गुन्हा घडल्या पासुन गेले ५ महिने पोलीस पथकास गुंगारा देवुन फरार होता. आरोपी सौरभ हा बीड मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ – मंचक अप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, महाळुगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस हवालदार चंदु गवारी, राजु जाधव, नागेश माळी, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, तानाजी गाडे, हिरामन सांगडे, शरद खैरे, श्रीधन इचके यांनी पार पाडली. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा