Subscribe Us

header ads

ग्रामस्थांनी पुलावरील वाहत्या पाण्यात उतरुन केला आमरण उपोषण सुरू

गेवराई_गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील लेंडी नदीच्या पुलाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून हा पुल धोकादायक बनला आहे. तसेच मोठा पाऊस झाल्यास पुलावरुन पाणी वाहते. परिणामी रोहितळसह परिसरातील संपर्क तुटतो. याबाबत संबंधीत विभागाकडे वेळोवेळी दुरुस्ती व पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली असताना देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत पुलावरील वाहत्या पाण्यात आज शनिवारी आंदोलन सुरु केले आहे. यावेळी प्रशासन व संबंधित विभागाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.गेवराई-जातेगाव रोडवरील रोहितळलगत असलेल्या लेंडी नदीवरील पुलाची आवस्था अत्यंत बिकट बनली आहे. या पुलावरुन मागील एक दिड महिण्यापासून दोन ते तीन फुट पाणी वाहते. त्यातच मोठा पाऊस आल्यास या नदीला मोठा पूर येतो. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पुर्णतः ठप्प होऊन जवळपास 25 ते 30 गावाच्या दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गेवराईला जाता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वेळोवेळी संबंधीत विभाग व प्रशासनाला निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने या पुल दुरुस्तीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी पुलावरील वाहत्या पाण्यात उतरुन आमरण उपोषण सुरू केले आहे.यावेळी प्रशासन व संबंधीत विभागाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. या आंदोलनात सरपंच मुकुंद बाबर, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष कैलास माने, सरपंच जगदिश काळे, प्रा. पि.टी.चव्हाण, ज्ञानेश्वर खाडे, सतीश पवार, सरपंच सतीश चव्हाण, ईश्वर पवार, युवा नेते दत्ता वाघमारे, विशाल पांढरे, संदीप कोकाट, जि.प.सदस्य पांडुरंग थडके, गोपाल चव्हाण, अभय पांढरे, भरत बादाडे, अंकुश धोडरे, आर.आर.आबा बहीर, सुलेमान भाई, विलास चव्हाण. सिद्धेश्वर काळे, काकासाहेब खेत्रे, रामेश्वर पवार, मदन लगड, राधेशाम धोंडरे, काकासाहेब पवार, ओविद बाबर, नाना पवार, योगेश पवार, सुजित पवार आदी उपस्थित होते.यावेळी तलवाडा पोलीस स्टेशनचे सपोनि प्रताप नवघरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र संबंधित विभाग सदरील पुलाचे काम करण्याचे लेखी आश्वासन जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा