Subscribe Us

header ads

मुलांची शाळा बंद, दुधउत्पादक अडचणीत अखेर रस्त्यासाठी लिंबागणेशकरांचे राज्यमार्गावर चक्काजाम आंदोलन

____
बीड_बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल वस्ति रस्ते व जिल्हाप्रशासनाला अग्रिम सुचना देऊन सुद्धा प्रशासनाच्या अनास्थेमुळे वाहुन गेलेला पुल आदि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मुलांची शाळा बंद झाली असून दवाखान्यात जाण्यासाठी तसेच दुधउत्पादक, भाजीपाला, बाजारहाट आदि कामांसाठी चिखलवाट तुडवित गावात जाण्यास मोठ्याप्रमाणात अडचण निर्माण झाल्याने अखेर दि.7 ऑक्टोबर गुरूवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा- पाटोदा राज्यमार्गावर चक्काजाम आंदोलन केले, यावेळी एपीआय मुस्तफा शेख, उपनिरीक्षक विलास जाधव नेकनुर पोलीस स्टेशन, मंडळ आधिकारी वंजारे, तलाठी पोतदार यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात सरपंच स्वप्निल गलधर, उपसरपंच शंकर वाणी, मा.पं.स.राजेभाऊ आप्पा गिरे, मा. सरपंच कल्याणबापु वाणी, रविंद्रजी निर्मळ,पांडुरंग वाणी, अर्जुन घोलप, शिवाजी वाणी, मच्छिंद्र वायभट, अक्षय वायभट, चक्रधर गिरे, राजेन्द्र ढास, दामोधर थोरात, राजेन्द्र मंडलिक, अर्जुन गोंडे, कोटुळे दाजी, रामा जाधव, जोगदंड उमेश, आदि. सहभागी होते. 

सविस्तर माहीतीस्तव:-
__
बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश ग्रामपंचायत हद्दीतील काळेवाडी, वायभट वस्ति, मुळेवस्ति, गिरेवस्ति, खिल्लारे वस्ति, गणेश नगर, वाणी वस्ति (चाहुर),नाईगडे वस्ति, जाधव वस्ति, ढवळे वस्ति, घाडगेवस्ति तसेच पोखरी रोडवरील शहादेव धलपे यांच्या घरापासुन रणखांब वस्तिवरील ग्रामस्थांना सव्वा दोन किलोमीटर सरकारी हक्कातील रस्ता मोजणी करून देण्यात यावा आदि वस्तिंना रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातुन चिखलवाट तुडवित गावात दवाखाना, शाळा, दुध डेअरी, बाजारहाट, किराणा आदिसाठी यावे लागते, दरवर्षीच पावसाळ्यात हा त्रास सहन करावा लागत असून लोकप्रतिनिधींकडून व जिल्हाप्रशासनाकडुन वारंवार निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष होत असल्या कारणाने अखेर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा पावित्रा घेतला.

पंकजाताईंनी रस्त्यासाठी दिलेला निधी पालकमंत्र्यांनी रद्द केला :- सरपंच स्वप्निल गलधर 
_____
 पंकजाताई मुंढे ग्रामविकासमंत्री असताना रस्त्यांसाठी दिलेला निधी सत्तांतर होताच पालकमंत्र्यांनी रद्द करून ईतरत्र वळवला त्यामुळेच रस्त्याची कामे रखडली असून ग्रामस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, विद्यमान आमदारांनी रद्द केलेला निधी उपलब्ध करून देण्याची दानत दाखवावी, आणि विकासकामात अडथळा आणुन ग्रामस्थांना वेठीस धरू नये .
 

लिंबागणेश-बोरखेड गणेश नदीवरील पुल सरकारी अनास्थेमुळे वाहुन गेला:-डाॅ.गणेश ढवळे 
___
लिंबागणेश ते बोरखेड गणेश नदीवरील पुल खचल्याची लेखी तक्रार केल्यानंतर उपअभियंता जिल्हापरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, शाखा अभियंता, मंडळ आधिकारी तलाठी यांनी स्थळपंचनामा करून 10 दिवस कोणतीच उपाययोजना न केल्याने वाहुन गेला यास सरकारी अनास्था कारणीभूत आहे. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.8180927572

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा