Subscribe Us

header ads

अंकुश नगर ते चऱ्हाटा रोड तीन महिन्यातच खराब; नगरपालिका च्या विरोधात न्यायालयात धाव घेणार

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_अंकुश नगर ते चऱ्हाटा रोड हा जवळपास एक किलोमीटरचा रस्ता सन 2020साली झालेला आहे सदरील रस्ता झाल्यानंतर केवळ तीन महिन्याच्या आत खड्डे पडायला सुरुवात झालेली  हा रस्ता सारडा कन्स्ट्रक्शन यांनी बनवलेला आहे.परिसरातील नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक वेळा नगरपालिके कडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी केले परंतु अद्याप पर्यंत हा रस्ता दुरुस्त झालेली नाही. उलट पावसामुळे आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एक वर्षाच्या आत रस्त्यामध्ये जवळपास 1000 छोटे आणि मोठे खड्डे पडले आहेत. या सर्व गोष्टीकडे येथिल जनप्रू नगरसेवक आणि प्रशासनाचे पुर्ण पणे दुर्लक्ष आहे.रस्ता हा तीन महिन्यांमध्ये खराब होतोच कसा हा मोठा प्रश्‍न असून या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. कुठलेही कामकरते वेळी त्याची वर्कऑर्डर प्रमाणे काम केलेले कोठेंही दिसत नाही. तरी सदरील कॉन्टॅक्टमध्ये रस्ता बांधकाम आणि बांधकामानंतर त्या रस्त्याची डागडुजी याचेदेखील कॉन्ट्रॅक्ट झालेले असते परंतु डाग डुग  करण्यात आलेली नाही अंकुश नगर मधील जवळपास सर्वच रस्ते हे याच प्रकारचे असल्याने परिसरामध्ये धुळ्याचे वातावरण झालेले निर्माण झाले आहे.
रस्ता खराब झाल्यामुळे अनेकदा अपघात झालेला आहे. त्याच सोबत परिसरातील नागरिकांमध्ये मणक्याचे आजार कमरेचे आजार श्वसनाचे आजार वाढत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. परिसरातील तरुणांनी रस्त्याचा सर्वे केला असता रस्त्यामध्ये जवळपास मोठे आणि लहान मिळून दोन हजार खड्डे पडलेले आहेत. सदरील रस्ता हा व्यवस्थित दुरुस्त न झाल्यास परिसरातील नागरिक महिला हे संबंधित गुत्तेदार व कंपनी इंजिनियर जनप्रतिनिधी नगरसेवक नगरपालिका प्रशासन यांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच रस्त्यामुळे झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास यामुळे देखील माननीय न्यायालयांमध्ये नुकसानभरपाईसाठी आणि फसवणूक केल्याबद्दल नगर परिषद बीड नगरसेवक इंजिनीयर यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्याबद्दल दावा दाखल करणार आहे. अशी माहिती दात न्यायालया मार्फत मागणार आहे. असे पत्र माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी व अँड फिडेल चव्हाण , राजेंद्र वीर , गोकुळ गायकवाड,मसु कांबळे,गोतम विर ,किशोर झोडगे,पिटु शिरसाट इत्यादी नागरीक उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा