Subscribe Us

header ads

बदनापूर येथे स्वस्त धान्य दुकानदार यांचा मनमानी कारभार--- महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष तथा प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सेक्रेटरी अकरमखान पठाण

बदनापूर-हाफीज हारून पठाण.

बदनापूर प्रतिनिधी_दिवाळी दसरा सारख्या मोठा सण तोंडावर  वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत त्याला तिलांजली देऊन दुकानदाराच्या सोयीप्रमाणे दुकाने उघडण्याचे मनमानी धोरण राबवले जात आहे. परिणामी, दुकानदारांची वाट पाहण्याची वेळ सामान्य लाभार्थीवर आली आहे. रिकाम्या हाती परत गेलेल्या लाभार्थ्यांनी दुकानदारांशी संपर्क साधल्यास तुम्ही वेळेत आले नाहीत म्हणून धान्य परत गेले, अशी उत्तरेही देऊन ग्राहकांना माघारी पाठवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच दक्षता समितीचे फलकच कित्येक दुकानात नसल्यामुळे या समित्यांची देखरेख करणारे पुरवठा अधिकारीही या सर्व प्रकारात सामील असल्याची शक्यता असून नियमित धान्य वितरीत न करणाऱ्या दुकानदारासह दक्षता समिती, पुरवठा अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी जेणेकरून सर्वसामान्य जनतेचे हक्काचे धान्य कुणी हिरावणार नाही अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष तथा प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सेक्रेटरी अकरमखान पठाण यांनी केली असून लवकरच यात सुधारणा झाली नाही तर मोठा लढा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या बाबत महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष तथा प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सेक्रेटरी अकरमखान पठाण यांनी स्वत: बदनापूर तालुक्यात फिरून पाहणी केली असता रेशनिंगबाबत अतिशय विदारक चित्र तालुक्यात आढळून आले आहे त्यांनी केलेल्या पाहणीत, तालुक्यावर ओढावलेल्या अतिवृष्टीच्या  परिस्थितीमुळे व ऐन दसरा-दिवाळी सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामान्यांना चढ्या दराने जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. या अडचणींमध्ये स्वस्त धान्य दुकानांच्या अनागोंदी कारभाराची भर पडत आहे. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे नागरिकांच्या सुविधेसाठी शहरातील स्वस्त धान्य दुकाने सकाळी चार तास दुपारनंतर चार तास तसेच, ज्या ठिकाणी आठवडे बाजार आहे तेथे पूर्णवेळ दुकाने खुली ठेवून लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्याचा नियम आहे. मात्र, तालुक्यातील बहुतांश रेशन दुकानदार नागरिकांच्या अडचणी वा कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता आपआपल्या सवडीनुसार दुकाने सुरू ठेवत असल्याचे दिसून आले.  दुकानदारांच्या या मनमानीमुळे नागरिकांना धान्य मिळण्यासाठी दुकानासमोर तासन‌्तास ताटकळत राहण्याची वेळ आल्याचे दिसून येते.  दुकान कधी सुरू होणार याची माहिती नसल्याने लाभार्थ्यांना हक्काचे धान्य मिळविण्यासाठी या दुकानांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. धान्यदुकानदारांना वेळेत धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याचा परिणाम पुरवठा विभागाकडूनच धान्यच आले नसल्याची उत्तरे लाभार्थ्यांना दिली जातात. जेव्हा धान्य येते तेव्हा लाभार्थी नसतात. नागरिकांकडून धान्य आल्याबाबत दुकानदारांकडे अनेकदा विचारणा केली जाते. मात्र, या दुकानदारांकडून या महिन्याचे धान्य आले नाही, यंदा कमी धान्य प्राप्त झाले, पुढील आठवड्यात चक्कर मारा, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात.बदनापूर तालुक्यातील बहुतांश रेशन दुकाने दररोज चालू नसतात किंवा ठराविक दिवशीच चालू असतात. सध्या कोरोना संसर्गामुळे गर्दी टाळण्यासाठी जास्तीत जास्त वेळ स्वस्त धान्य दुकान सुरू ठेवणे आवश्यक आहे तरीही काही दुकाने सकाळी 2-3 तास चालू असतात त्यामुळे धान्य मिळेल की नाही म्हणून नागरिक रेशन दुकानांसमोर गर्दी करतात व सोशल डिस्टंस पाळला जात नाही.  पुरवठा विभागाकडे विचारणा केली असता दक्षता समितीकडे तक्रार करण्याचे सांगण्यात येत आहे. दक्षता समितीबद्दल माहिती विचारल्यास संबंधित गावातील तलाठी यांना विचारा असे सांगून उडवाउडावीची उत्तरे देण्यात येतात  वास्तविक पाहता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य शासनाने  गाव, तालुका, जिल्हास्तरावर दक्षता समित्या गठीत केल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानदाराने शासनाकडून मिळालेल्या शिधावस्तूंची काळ्याबाजारात विक्री केल्याचे किंवा कोणत्याही अनधिकृत मार्गाने विल्हेवाट लावल्याचे दक्षता समितीच्या निदर्शनास आल्यास सदर समिती त्या स्वस्त धान्य दुकानास सील लावू शकते. मात्र, तालुक्यात या दक्षता समित्यांचे अस्तित्वच दिसून येत नसल्याचेही महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष तथा प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सेक्रेटरी अकरमखान पठाण यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्यातील दक्षता समिती, पुरवठा अधिकारी व सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीतील सर्वच अधिकारी – कर्मचारीही या साखळीत सामील असल्याचाच संशय या निमित्ताने उघड होत असल्याचा आरोपच अक्रम खान पठाण यांनी केला असून तात्काळ हा सावळा – गोंधळ थांबवून ही गोरगरीब जनतेचा हक्काचा घास त्यांना मिळावा यासाठी जनआंदोलन छेडण्याचा विचार असल्याचेही महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष तथा प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सेक्रेटरी अकरमखान पठाण यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा