Subscribe Us

header ads

मुनव्वर सुलताना मैत्रा फाउंडेशनच्या शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मानित

बीड (प्रतिनिधी) - शहरातील बालेपीर भागात असलेल्या रोशनपुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शेख मुनव्वर सुलताना मुहम्मद युसूफ़ यांना मैत्रा फाऊंडेशन च्या शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.मुनव्वर सुलताना या जिल्हा परिषद शिक्षण विभागात सहशिक्षक पदी ३५ वर्षांपूर्वी रुजू झाल्या होत्या. विद्यार्थी आणि शिक्षणासाठी झोकून देऊन कार्य करत असल्याने त्या आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविल्या गेल्या आहेत. पदोन्नती नंतर काही वर्षापासून त्या मुख्याध्यापिका पदावर कार्यरत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांना नामवंत रोटरी क्लब चा आदर्श मुख्याध्यापिका तसेच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना मैत्रा फाउंडेशनच्या शिक्षण महर्षी पुरस्काराने फाउंडेशनचे अध्यक्ष द.ल. वारे, उपाध्यक्षा शितल बळे, सचिव हर्षा ढाकणे, कोषाध्यक्ष उज्वला वनवे, जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी मुनव्वर सुलताना यांच्या शिक्षण क्षेत्रातील कारकीर्दीचा आलेख पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. जिल्हा परिषद बीड चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, समाज कल्याण आयुक्त सचिन मडावी, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, खटोड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतम भाऊ खटोड, ग्रंथालय अधिकारी संजय मस्के, गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव, उपशिक्षणाधिकारी तुकाराम पवार, ज्येष्ठ साहित्यिक भास्कर बडे, ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, संतोष मानूरकर, पत्रकार भागवत तावरे, संतोष ढाकणे यांच्या हस्ते मुनव्वर सुलताना यांना  दिनांक 3 ऑक्टोबर रविवार रोजी शहरातील अहेमदनगर रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सन्मानित करण्यात आले. त्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आल्याने समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत असून शुभेच्छा दिल्या जात आहे. तसेच त्यांच्या हातून  यापुढेही विद्यार्थी व शिक्षणासाठी चांगले भरीव काम होत राहो. अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा