Subscribe Us

header ads

टाकळी येथील बलात्कार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा होऊन दोन महिन्यात खटला निकाली काढा - वंचित बहुजन आघाडी.


 प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे 
 
परंडा_ उस्मानाबाद येथील परंडा तालुक्यातील मौजे टाकळी या गावातील वडार समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा होण्यासाठी गुणवत्तेवर आधारित तपास करून दोषारोपपत्र जलदगती न्यायालयात दाखल करून खटला दोन महिन्याच्या आत निकाली काढावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी असलेले निवेदन माननीय पोलीस महासंचालक तसेच जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना तहसील कार्यालय परंडा मार्फत देण्यात आले.वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रनबागुल ,फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक तथा जिल्हा प्रवक्ता डॉ शहाजी चंदनशिवे ,जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,जिल्हा सचिव मोहन दादा बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले.
      सविस्तर वृत्तांत असा की मौजे टाकळी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथे दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी वडार समाजातील एका अकरा वर्षीय वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर त्याच गावातील एका 24 वर्षाच्या आरोपीने बलात्कार केल्याप्रकरणी परंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 328/ 2021 भा द वि 376 ,506 कलमा सह पोस्को कायदा 4,8 ,12 कलमान्वये गुन्हा दाखल असून याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करत आहेत.ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी ,अतिशय घृणास्पद ,निंदनीय व मनामध्ये चीड येणारी आहे तसेच परांडा शहरातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी  राहणार परांडा यास पोस्को आणि विनयभंग गुन्हा नोंद झाला असला तरी आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी त्वरित पुनर्वसन करून झालेल्या मानसिक व शारीरिक नुकसानीबद्दल भरपाई देण्यात  यावी दोन्ही खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालू होऊन पिडीतांना न्याय देण्यात यावा  या बाबतचे निवेदन राज्य शासनाला देण्यात आले .पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे आणि तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांना सदर प्रकरणी निवेदन देण्यात आले असून त्यांनी ते स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी मार्गस्थ केले .या निवेदनामध्ये गुन्ह्यातील आरोपींना बलात्कार करून खून करणे अशा प्रकारचा घृणास्पद गुन्हा करण्यास मदत करणाऱ्या व या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेऊन आढळून आलेल्या सर्व आरोपींना सह आरोपी करावे .गुन्ह्यात आढळून आलेल्या आरोपीसह सर्वच आरोपींचे सीडीआर ये एसडीआर ए मोबाइल टॉवर लोकेशन काढून दोषारोपपत्र समाविष्ट करावे. गुन्ह्याचा सर्व तपास गुणवत्तेच्या आधारे करण्यात यावा.  फिर्यादी व साक्षीदार यांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात .सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या खटल्यात वरिष्ठ विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती करावी .जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी व फिर्यादीस भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्यांना नियमानुसार मिळणारी आर्थिक सहाय्य तात्काळ देण्यात यावे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना नियमानुसार मिळणाऱ्या आर्थिक अनुदान व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाख व प्रधानमंत्री सहायता निधीतून दहा लाख रुपये अनुदान मदत म्हणून देण्यात यावे .या सर्व मागण्या वंचित बहुजन आघाडी ने निवेदनामध्ये नमूद केल्या आहेत .यामध्ये थोडीशीही कसर दिसून आली तर वंचित बहुजन आघाडी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद समोर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा प्रवक्ते तथा फुले आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे ,जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,जिल्हा सह सचिव मोहन दादा बनसोडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वैभव गायकवाड, जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष ईटकर ,तालुका अध्यक्ष दिपक ओहाळ , परंडा तालुका महासचिव दयानंद बनसोडे, तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे ,तालुका प्रवक्ता रणधीर मिसाळ, भूम तालुका अध्यक्ष मुसाभाई शेख  ,किशोर काळे , गायकवाड ,तेजस चौधरी, रवींद्र लोंढे ,विकास कांबळे , आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा