अंबाजोगाई : राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत काँग्रेसने असंख्य कार्यकर्त्यांसह अंबाजोगाईत छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मंगळवार, दिनांक 5 ऑक्टोबरला ‘जेलभरो’ आंदोलन केले. यावेळेस पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करून सुटका केली. याबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांना सोडा अन्यथा बीड जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.राजेसाहेब देशमुख म्हणाले की, देशातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे धोरणच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आखले असून शेतकरी संपवण्याचे पाप केले जात आहे. बसलेल्या शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची ही संतापजनक घटना तालिबानी प्रवृत्तीचे निदर्शक असून शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजपचे केंद्रातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यासह अंबाजोगाईत ‘जेलभरो’ आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी आंदोलनातील हिंसेची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली.
अंबाजोगाईत झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंतराव मोरे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष वसंतराव मोरे, काँग्रेसचे राज्य समन्वयक संजय वाघमारे, शंभूराजे देशमुख, शेख नबीसेठ, ईश्वर शिंदे, ॲड. तारेख अली उस्मानी, एनएसयूआयचे माजी जिल्हाध्यक्ष राहूल टेकाळे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पिराजी इंगळे, तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, अशोक देशमुख, सतीश भगत, प्रविण सोमवंशी, अशोक पवार, धनंजय कोळगिरे, नय्युम शेख, समीर शेख, चाँद खाँ पठाण, मकदुम शेख, असगर शेख, गौस शेख, हमीद शेख, किरण उबाळे, अनिल औताडे, प्रशांत आचार्य, वैभव तरकसे, उध्दव गंगणे, महेश कदम, गोविंद थोरात, अंगद मुळूक, सुरज देशमुख, महाराज देशमुख आदींसह काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले.
0 टिप्पण्या