Subscribe Us

header ads

आज झालेल्या बैठकीमुळे महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या लाभधारकांची प्रतीक्षा संपणार


उप संपादक.जाकेर सय्यद


मुंबई_आज सह्याद्री विश्रामगृह मुंबई येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रिय अध्यक्ष मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाची बैठक पार पडली,ज्यात बऱ्याच दिवसा पासून प्रलंबीत/अडगळीत पडलेले *०३,०४,०५ लाख रुपयांची* एन एफ डी सी ची कर्ज प्रकरणे येत्या महिना भरात निकाली काढण्याचे ठोस आश्वासन महात्मा फुले महामंडळाचे महासंचालक बिपिन श्रीमाळी यांनी दिले.
*लागलीच तशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.*
         या बैठकीस केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रिय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे महासंचालक बिपिन श्रीमाळी साहेब,रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे साहेब,मुख्य व्यवस्थापक प्रशांत गेडाम आणि सुमित वांजळे उपस्थीत होते.
         *आज झालेल्या या बैठकी मुळे राज्यातील लाभधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा