Subscribe Us

header ads

बीड जिल्हा रूग्णालयात कार्डियाक कॅथ लॅब व कर्करोग रेडिओ थेरपी युनिट तात्काळ कार्यान्वित करा; आ.संदिप क्षीरसागर यांची पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे मागणी


बीड (प्रतिनिधी):- बीड येथे नवीन आरोग्य संस्थेस मान्यता देण्यात आली असून त्या मान्यतेच्या आधारे शासकीय रूग्णालय बीड येथे कार्डियाक कार्डियाक कॅथ लॅब व कर्करोग रेडिओ थेरपी युनिट, साथरोगासाठी अद्यावत रूग्णालय तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी बीडचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे केली आहे.बीड जिल्हा रूग्णालय येथे नवीन आरोग्य संस्था उभारीस मान्यता देण्यात आली असून त्यामध्ये नवीन कार्डियाक कॅथलॅब, साथरोगाचे अद्यावत रूग्णालय, कर्करोगासाठी रेडिओ थेरपी युनिट साथरोगासाठी अद्यावत रूग्णालय आदींचा दि.30 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मागील काही दिवसापूर्वी बीड जिल्हात आरोग्य संस्थांनी केलेल्या सर्व्हे नुसार महिलांन मध्ये कर्क रोगाचे प्रमाण वाढलेले आहे,त्यांना उपचार घेणे परवडत नसल्याने तसेच जिल्हात उपचार होत नसल्याने रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे,आता या बीड जिल्हा रूग्णालय याठिकाणी रूग्णांची गैरसोय होवू नये, रूग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी कार्डियाक कॅथलॅब, कर्करोगासाठी रेडिओ थेरपी युनिट व साथरोगासाठी अद्यावत रूग्णालय तात्काळ सुरू करावे अशी मागणी करत या बाबत जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात असे ही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. हे तीनही युनिट बीड जिल्हा रूग्णालयाच्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील रूग्णांना याची मोठी मदत होवून आधार मिळेल.


30 खाटाच्या आयुष रूग्णालयाच्या जागेसाठी पाठपुरावा
बीड येथे 30 खाटाचे आयुष रूग्णालय राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत मंजुर आहे. या रूग्णालयासाठी बीड शहरात व परिसरात जागा उपलब्ध व्हावी यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा जिल्हा रूग्णालय प्रशासन, महसूल प्रशासन यांच्याशी पाठपुरावा सुरू असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी अधिकचे लक्ष घालून जागा तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे,जिल्हाधिकारी शर्मा यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा