Subscribe Us

header ads

नालंदा बुद्धिविहार खासबाग बीड या ठीकाणी वर्षावास सामारोप कार्यक्रम संपन्न

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी/दि. १९ बीड शहरातील खासबाग येथील नालंदा बुद्ध विहारात वर्षावसाच्या कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. वर्षावासा निमित्त "बुद्ध आणि त्यांचा धम्म " या धम्मग्रंथाचे वाचन ठेवण्यात आले होते, आज या ग्रंथ वाचनाच्या समारोपचा कार्यक्रम बीड येथील हेड पोस्ट ऑफिस चे प्रधान डाकपाल अमरसिंग ढाका यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्थित बौद्ध उपासक आणि उपासिका यांना मार्गदर्शन करताना धम्म बंधू अमरसिंग ढाका यांनी बुद्धाचा धम्म अगदी सोप्या आणि सध्या भाषेत उपस्थिताना समाजावून सांगितला, कुशल कर्म करून पुण्यकर्माचा संचय करणे म्हणजेच धम्माचे आचरण आहे. आचरणातून धम्म दिसणे आवश्यक आहे, असे यावेळी ते म्हणाले. या प्रसंगी 

खासबाग बीड येथील रहिवाशी ऍड. नितीन वाघमारे यांनी देखील उपस्थिताना संबोधित केले. या प्रसंगी खासबाग बीड येथील ज्येष्ठ महिला, तानाबाई सौंदर्मल, कांताबाई शिंदे, छाबुबाई वडमारे, व ईतर धम्म भगिनी उपस्थित होत्या. या प्रसंगी ग्रंथ वाचक मनिषा शिंदे आणि कार्यक्रमा निमित्त खीरदान करणाऱ्या विद्याताई वडामारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वन्दनेने होऊन शेवट सरणत्तय ने करण्यात आला. कार्यक्रमानंतर खीरदान करण्यात येऊन कार्यक्रम संपन्न झाला. वर्षावास समारोपाच्या कार्यक्रमास स्थानिक नागरिक तसेच आबालवृद्धांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा