Subscribe Us

header ads

विद्युत तार तुटल्याने शेतकऱ्यांचा 10 एकर ऊस जळून खाक

बीड स्पीड न्यूज 

बीड_बीड जिल्ह्यात महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विद्युत तार तुटल्याने, तीन शेतकऱ्यांचा तब्बल दहा एकर ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना आज सकाळी 10 च्या दरम्यान, बीडच्या वडवणी तालुक्यात असणाऱ्या काडीवडगाव येथे घडली आहे. रामेश्वर आच्युतराव बादाडे, एकनाथ शेषराव बादाडे आणि महारुद्र दत्तात्रय राऊत असं त्या तीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नावं आहेत. महावितरणच्या बेजबाबदार पणामुळे लोंबकळणाऱ्या ताराने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे. तरी देखील या महावितरण कंपनीला जाग येत नसल्याने, शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान तात्काळ नुकसानग्रस्त ऊसाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. त्याचबरोबर जिल्ह्यातील लोंबकणाऱ्या तारा दुरुस्त करा अन्यथा मनसे आंदोलन करीन असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा