Subscribe Us

header ads

गोदावरी नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू; गेवराई तालुक्यातील सुरळेगावतील दुर्दैवी घटना

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_गेवराई तालुक्यातील सुरळेगावतील एका युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदीतील डोहात बुडून एका १७ वर्षीय युवकाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेवराई तालुक्यातील सुरळेगाव याठिकाणी आज मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.तान्हाजी लिंबाजी आरबड (वय १७ वर्ष) रा.सुरळेगाव ता.गेवराई जि.बीड असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.दरम्यान आज सकाळी गावातील काही तरुण रोजच्याप्रमाणे नदीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी तान्हाजी लिंबाजी आरबड याला नदीच्या एका डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हि बाब सोबत असलेल्या तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. दरम्यान गावातील पट्टीचे पोहणारे शरद भंडारे या तरुणाने सदरील डोहात उडी मारुन तान्हाजीला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तान्हाजीचा डोहात बुडाल्याने दुर्देवी मृत्यू झाला. मयत तान्हाजी हा नेहमी हसतमुख स्वभावाचा होता.आणि आई वडिलाला एकूंता एक मुलगा होता. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा