Subscribe Us

header ads

इशान, सुर्यकुमारची दमदार झुंज अपयशी; मुंबई इंडियन्स अखेर स्पर्धेबाहेर!

आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफच्या चौथ्या स्थानासाठी चांगलीच रंगत झाली. पंजाब आणि राजस्थान बाहेर गेल्यानंतर मुंबई आणि कोलकातामध्ये चढाओढ सुरु होती. मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र पदरी निराशा आली. इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांचे प्रयत्न अपुरे पडले. हैदराबाद पराभूत झाली मात्र मुंबईला धावगती वाढवण्यात अपयश आलं. हैदराबादच्या सलामीवीरांनी पहिल्या गड्यासाठी ६४ धावा करताच मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या समीकरणामुळे कोलकाताची प्लेऑफमध्ये वर्णी लागली आहे.सर्वात प्रथम नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागल्याने आशा जिवंत झाल्या. त्यात आघाडीला आलेल्या रोहित शर्मा आणि इशान किशनने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८० धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा १८ धावा करून बाद झाला. मात्र इशान किशनने आक्रमक खेळी केली. इशाननं आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक झळकावलं आहे. १६ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. इशान किशन ३२ चेंडूत ८४ धावा करून बाद झाला. इशाननंतर सूर्यकुमार यादवने मोर्चा सांभाळला. दुसऱ्या बाजूने हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या अपयशी ठरले असले तरी, सूर्याने धावगती वाढवली. १७व्या षटकात सूर्यकुमार यादवने कौलला चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात मुंबईने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. जेसन होल्डरने शेवटच्या षटकात सूर्यकुमारला फसवले. सूर्याने ४० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात होल्डरने फक्त ५ धावा दिल्यामुळे मुंबईला अडीचशेचा टप्पा गाठता आला नाही. मुंबईने २० षटकात ९ बाद २३५ धावा केल्या. होल्डरने ४ बळी घेतले. या धावसंंख्येसह मुंबईने आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्येचा नवा विक्रम नोंदवला. पण इतकं करूनही हैदराबादला कमी धावांवर रोखता आलं नाही.

मुंबईची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, जेम्स नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, ट्रेंट बोल्ट.

हैदराबादची प्लेईंग इलेव्हन
जेसन रॉय, अभिषेक शर्मा, मनीष पांडे (कप्तान), प्रियम गर्ग, अब्दुल समद, वृद्धिमान साहा, जेसन होल्डर, राशिद खान, मोहम्मद नबी, उमरान मलिक, सिद्धार्थ कौल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा