Subscribe Us

header ads

निवासी डॉक्टरांना प्रत्येकी एक लाख २१ हजार रुपये---मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : करोना रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी एक लाख २१ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसमवेत बैठक घेऊन त्यांच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाने दोन दिवसात शासन निर्णय जारी केला आहे.या निर्णयानुसार शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना करोना काळातील रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला एक लाख २१ हजार रुपये देण्यात येतील. हा शासन निर्णय तातडीने जारी केल्याने मार्डचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वार ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा