Subscribe Us

header ads

सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करणार----राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन

 

बीड स्पीड न्यूज 

बीड, (जिमाका) दि.  २७:--सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि तक्रारी सोडविण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोग सक्षमपणे काम करत असून आयोगाकडे वेबसाईटवर तसेच ई-मेल , फोन , व्हाट्सअप व पत्राद्वारे येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल असे राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाचे चेअरमन श्री एम. व्यंकटेशन यांनी सांगितले .ते म्हणाले,  समाजाच्या स्वास्थ्य आणि आरोग्य यासाठी सफाई कामगार हा सतत काम करत असतो कोरोना संसर्गाच्या काळात देखील ज्या चार प्रमुख घटकांनी या साथी विरोधात लढा दिला त्या कोविड योद्ध्यांमध्ये मध्ये वैद्यकीय , पोलीस , स्वच्छता कर्मचारी आणि सरकारी यंत्रणातील व्यक्तींचा प्रमुख सहभाग होता. त्यापैकी स्वच्छता कर्मचारी हे  आर्थिक दृष्ट्या कुमकुवत आहेत ते वगळता कोरोना लढ्यातील इतर तीनही घटक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. सफाई कर्मचाऱ्यांबाबत संवेदनशील असले पाहिजे, असे श्री व्यंकटेशन म्हणाले.बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात श्री एम व्यंकटेशन  यांचा अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा , जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा , निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत , जिल्ह्यातील सर्व नगर परिषद मुख्याधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी,  उपविभागीय अधिकारी आणि सफाई कर्मचारी संघटना, पदाधिकारी,  प्रतिनिधी,  सफाई कर्मचारी उपस्थित होते. 

 

याप्रसंगी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेशन यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि केलेले मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्री आर राजा यांनी मराठी मध्ये सर्व संबंधितास समजावून सांगितलेयावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री शर्मा म्हणाले, स्वच्छता कर्मचाऱ्यांची माणुसकीच्या नात्याने वागले पाहिजे.  जिल्ह्यातील सर्व नगर परिषद मुख्याधिकारी यांनी स्वच्छता कामांसाठी नियुक्त केलेल्या गुत्तेदार यांचेमार्फत सफाई कर्मचार्‍यांचे पगार मोबदला वेळेवर दिले जात आहेत की नाही याची काळजीपूर्वक पाहणी केली जावी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार न देणे हा गुन्हा असून असे प्रकार आढळून संबंधित गुत्तेदार यांना काळ्या यादीत टाकून कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्री शर्मा म्हणाले. यावेळी आयोगाचे अध्यक्ष श्री व्यंकटेशन यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारी व अडचणी ऐकून घेतल्या आणि याबाबत त्या सोडवण्यासाठी तातडीने संबंधित अधिकारी आणि गुत्तेदार यांना निर्देश दिले. याप्रसंगी स्वच्छता कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आदींनी बाजू मांडून आपली निवेदने सादर केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा