Subscribe Us

header ads

सुलतानपुर येथे ऊसाच्या शेतात हातभट्टीवर धाड

बीड प्रतिनिधी_ माजलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाच्या शेतात सुरू असलेल्या एका हातभट्टीवर पोलीसांनी धाड टाकून ४०० लीटर हातभट्टी दारू नष्ट केली.माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुलतानपुर येथे ऊसाच्या शेतात हातभट्टी दारू तयार करून त्याची विक्री होत असल्याची माहिती बीट अंमलदार भागवत शेलार यांना मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह तेथे धाड टाकली असता ४०० लीटर हातभट्टी दारू मिळून आली. ही दारू नष्ट करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जोनवळ, पीएसआय दाभाडे, बीट अंमलदार भागवत शेलार, चौव्हाण, म्हेत्रे यांनी आज दुपारी १२.३० वाजता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा