Subscribe Us

header ads

सुरत येथे सहस्त्रदिन पुर्ती सोहळा

(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)

सुरत(गुजरात) येथील "गजानन इंजिनियरिंग अॕन्ड मॕन्युफॕक्चरिंग"च्या वतीने  *सहस्त्रदिन पुर्ती* सोहळ्याचे आयोजन आगळ्या -वेगळ्या पध्दतीने करण्यात आले आहे.गजानन इंजिनियरिंग अॕन्ड मॕन्युफॕक्चरिंग  या कारखान्यास यशस्वी उत्पादनाचे 'सहस्त्रदिन' पुर्ण झाल्याबद्दल दिं.१७आक्टोबर २०२१रोजी  सुरत(गुजरात ) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कारखान्याचे संचालक  गजानन वानखेडे यांनी शुन्यातुन जिद्द ,कष्ट,प्रामाणिकपणा याचा अंगिकार करुन उत्पादनात यश संपादन केले.प्रामुख्याने 'अंबिका ब्राॕन्ड 'पिठाची गिरणी (रोटरवाली चक्की) ची निर्मिती केली.या प्रकल्पाच्या उत्पादनाची महाराष्ट्र ,गुजरात व इतर प्रदेशातुन मागणी होत आहे.तसेच या प्रकल्पातर्गंत व्यवसायासाठी कमी जागेत सुरु करण्यात येणाऱ्या 'पिठाची गिरणी ' ची माहिती या कार्यक्रमात देण्यात येणार आहे.संचालक गजानन वानखेडे हे आपल्या अनुभवातुन उभारलेल्या यशस्वी प्रकल्पाची माहिती देणार आहेत.या कार्यक्रमास विविध ठिकाणाहून ग्राहक ,मित्र,हितचिंतक उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी मनोरंजन एस.के.म्युझिक पार्टी चे आयोजनही करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा