Subscribe Us

header ads

मिसाळवाडी येथे गुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकाच्या अंगावर विज पडुन जागीच मृत्यू

पाटोदा_पाटोदा तालुक्यातील डोंगरकिंन्ही जवळ असणाऱ्या मिसाळवाडी येथे विज पडुन एक युवक जागीच ठार झाला असुन विज अंगावर पडून ठार झालेल्या युवकाचे नाव  शिवराज गोविंद चव्हाण (वय 16) वर्षे  असे आहे. यामुळे डोंगरकिंन्ही मिसाळवाडी परिसरात या  घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.डोंगरकिंन्ही जवळ असणाऱ्या मिसाळवाडी येथील शिवराज गोविंद चव्हाण हा युवक व अंकुश सोनाजी चव्हाण (वय 55) वर्षे हे दोघे मिसाळवाडी शिवारात असणाऱ्या गवळवाडी माळरानावर गुरे चारण्यासाठी शनिवारी गेले होते. याच वेळी साडेतीन ते चारच्या सुमारास आचानक विजांचा कडकडाट सुरु झाला. याच वेळी शिवराज गोविंद चव्हाण या युवकाच्या अंगावर विज कोसळली यात गोविंद चव्हाण या युवकाचे जागेवरच मृत्यू झाले .मिसाळवाडी येथील विज पडून ठार झालेला युवक शिवराज गोविंद चव्हाण हा अकरावीच्या वर्गात पिंपळवंडीत येथे शिक्षण घेत होता. ज्यावेळी विज पडली त्यावेळी अंकुश सोनाजी चव्हाण हे वयोवृद्ध देखील त्या युवका सोबत होते.अंकुश सोनाजी चव्हाण हे बालंबाल वाचले.मिसाळवाडी येथील विज पडुन मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाला आर्थीक मदत देण्याची मागणी पाटोदा तालुक्यातुन होत आहे. विज पडून  मृत्यू झालेला गोविंद चव्हाण हा युवक धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्याने आळंदी येथे पखवाज वादनाचे धडे देखील घेतले होते. यामुळे तो डोंगरकिंन्ही परिसरात उत्तम पखवाज वादक म्हणून प्रसिद्ध होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा