Subscribe Us

header ads

पीक वाहून गेल्याने शहाजानपूर येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


प्रतिनिधी नवनाथ गोरे
♦♦♦♦♦♦

वाकनाथपुर प्रतिनिधी_अतिवष्टीमुळे झाल्याने बीड  जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी कर्ज काडून शेतामध्ये बियाणे खत घालतात पण कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ या मुळे बळीराजा निराश होऊन आत्महत्या करत आहेत. काल शुक्रवार दिनांक ८ रोजी सर्व पीक वाया गेल्याने कर्ज कशाने फेडायचे या काळजीने तालुक्यातील नाथापुर जवळ असणारे शहाजानपूर येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अशोक बाबासाहेब मते (वय ४०) वर्ष या शेतकऱ्याने शुक्रवार रात्री ९ : ३० वाजण्याच्या दरम्यान शेतातात जाऊन चींचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शेतात गेलेला अशोक हा घरी न आल्याने घरची मंडळी अशोकला शोधण्यासाठी शेतात गेले शेतात अशोकने गळफास घेतलेला बघुन घरच्यांनी टाहो फोडला आरडा ओरडा ऐकून गावातील नागरीक शेतात जमा झाले रात्री ११:३० च्या आसपास ही महिती पिंपळनेर पोलीस ठाण्यात कळवण्यात आली माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नंदकिशोर सवासे साहेब.आणि होमगार्ड भोसले हे १२ वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालात पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन झाल्या नंतर मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला अशोक यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा