Subscribe Us

header ads

महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी परळी बंदचे आवाहन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) लखीमपूर शेतकरी हत्या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देश आणि राज्यातील विरोधक एकवटले आहेत. शेतकऱ्यांना चिरडून मारल्याचा निषेधार्थ येत्या सोमवार ११ ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे.त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बहाद्दुर भाई, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते आदींनी केले आहे.भाजपच्या हाती सत्ता आहे म्हणून त्यांच्याकडून होणारा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसत आहे. शांततेच्या मार्गाने निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी गाड्या घातल्या आहेत. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्यांना शेतकऱ्यांबद्दल काय आस्था नाही. शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून भाजपा कार्यकर्त्यानी शेतकऱ्यांची हत्या केली आहे. शेतकऱ्यांची हत्या करण्याचा निर्णय घेणाऱ्या या भाजप सरकारचा विरोध करण्यासाठी 'महाराष्ट्र बंद'चा निर्णय घेतला आहे.



या बंदबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते कॉ. पी. एस. घाडगे सरांशी संपर्क साधला असता त्यांनी ११ ऑक्टोबरच्या बंदला पाठिंबा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा