Subscribe Us

header ads

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींबाबतच्या विषयाला हात घालणार नाही--- पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पूरी

बीड स्पीड न्यूज 

नवी दिल्ली_ गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वारंवार वाढताना दिसून येत आहेत. अगदी आज रविवारी देखील या किंमतींमध्ये वाढ झालेली पहायला मिळाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने 30 ते 35 पैश्यांनी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधनांचे भाव दररोज वाढवले आहेत. आज रविवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. आज डिझेलचे दर 33 ते 37 पैश्यांनी तर पेट्रोलचे दर 31 ते 35 पैश्यांनी वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसून येत आहेत. या ऑक्टोबर महिन्यात तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती जवळपास प्रत्येक दिवशी वाढल्या आहेत. याबाबत दिल्लीमध्ये काल एका कार्यक्रमात बोलताना पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी आपलं म्हणणं मांडलंय.कोरोना काळातील सततच्या लॉकडाऊनमुळे आधीच जनसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडले आहे. आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे, मात्र, तरिही महागाईच्या झळा सामान्यांना बसताना दिसत आहेत. मोदी सरकारने वारंवार सामान्यांना अच्छे दिनाचं स्वप्न दाखवलं आहे. मात्र प्रत्यक्षात सामान्यांना हे अच्छे दिन अनुभवायला मिळालेले नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या या इंधनदरामुळे त्याचा इतर सगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दळणवळण आणि वाहतुकीत वाढ एकूण महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या इंधन दरवाढीबाबत विचारलं असता मंत्री हरदीप सिंग यांनी म्हटलंय की, आज डिझेल आणि पेट्रोलचा वापर हा कोरोनापूर्व काळापेक्षाही अधिक आहे. पेट्रोलचा आजचा वापर हा कोरोनापूर्व काळापेक्षा 10-15 टक्क्यांनी अधिक तर डिझेलचा वापर 6-10 टक्क्यांनी अधिक आहे. मी सध्या किंमतींबाबतच्या विषयाला हात घालणार नाही. आम्ही हे दर स्थिर कसे होतील, याबाबत सतत काम करत राहू, असं मत त्यांनी मांडलंय.

काय आहेत रविवारचे भाव


दिल्लीमध्ये, पेट्रोलचा भाव 105.84 रुपये तर डिझेलचा भाव 94.57 रुपये प्रती लीटर आहे. मुंबईमध्ये, पेट्रोलची किंमत 111.77 रुपये तर डिझेलची किंमत 102.52 रुपये प्रती लीटर आहे. कोलकातामध्ये, पेट्रोलचा भाव 106.43 रुपये तर डिझेलचा भाव 97.68 रुपये प्रती लीटर आहे. तर चेन्नईमध्ये, देखील पेट्रोलचा भाव 103.01 रुपये तर डिझेलचा दर 98.92 रुपये प्रती लीटर आहे.या राज्यात पेट्रोल आहे शंभरी पार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडीसा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत सर्वाधिक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा