बीड_ महाराष्ट्रातील 38 जिल्ह्यापैकी 35 जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर कधी नव्हे ते यावर्षीच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रातील विशेषत: मराठवाडा आणि बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्वच पीक हातचे गेले आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्यांना घोषीत केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी असून प्रत्येक हेक्टरी किमान शेतकर्यांना 50 हजाराची मदत करावी अशी मागणी बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष रमेश गालफाडे यांनी केली.गालफाडे हे बीड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. रमेश तात्या गालफाडे, सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील 10 वी 12 वीच्या स्पर्धा परीक्षामधील गुणवतांचा सत्कारासाठी आले असता ते पत्रकारांशी वार्तालाप करत होते. तब्बल एक महिनाभर त्यांनी महाराष्ट्रातील 35 जिल्ह्याचा दौरा करून या बाबतचा स्वत:चा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांना सादर केला. या निवेदनात त्यांनी शेतकर्यांना प्रति हेक्टरी किमान 50 हजाराची मदत करावी ती ही दिवाळीच्या अगोदर करावी अशी मागणी केली. रमेश तात्या गालफाडे सामाजिक प्रतिष्ठान हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात राज्यात काम करत आहे. गेल्यावर्षी त्यांनी केज तालुक्यात अनेक वंचित लोकांना रोख स्वरूपातही मदत केली आहे. शिक्षण घेत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांचे फिस ही त्यांनी भरली आहे. केज येथे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठानातून एक रूग्णवाहिका दिलेली आहे. बहुजन रयत परिषदेची राजकीय भूमिका या परिषदेचे संस्थापक माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हेच स्पष्ट करतील. मी मात्र वंचित घटकातून आल्यामुळे बहुजनातील विद्यार्थ्यांनी शिकावे, संघटीत व्हावे, स्पर्धा परीक्षेत अभ्यास करून अधिकारी व्हावे यासाठी काम करत आहे. बीड जिल्ह्यातील जे काही जे वंचित आहेत त्यांना माझ्या प्रतिष्ठानच्या वतीने शक्य तेवढी आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत करतो. बीड येथे आज जवळपास 55 विद्यार्थ्यांचा मी त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मरायला आलो आहे. जेणेकरून पुढील शैक्षणिक करीअरसाठी प्रेरणा मिळेल. भविष्यातही मी माझ्या प्रतिष्ठानच्या वतीने काम करेल असेही ते म्हणाले.
0 टिप्पण्या