Subscribe Us

header ads

देशमुख कुटूंबास ‘मॅनकाईंड’कडून मदतीचा हात कोरोनामुळे डॉ.देशमुख यांचा झाला होता मृत्यू

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी_कोरोनाच्या संकटकाळातही पशुधनाची सेवा करणार्‍या डॉ.धनाजी देशमुख यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्‍चात देशमुख कुटूंबीयांना मदत म्हणून मॅनकाईंड  फार्मा या कंपनीने तीन लाख रुपयांची मदत डॉ.डी.पी.तांदळे यांच्या हस्ते अरुणा धनाजी देशमुख यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अधिकारी, कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.मॅनकाईंड कंपनीकडून सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच योगदान दिले जाते. गत दोन वर्षात कोरोना संसर्गाच्या संकटात कंपनीच्या वतीने शक्य होईल त्या ठिकाणी मदतीचा हात दिला आहे. कोरोना संकटाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते. तसेच पशुवैद्यकीय क्षेत्रातील अधिकारीही पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेत होते. या दरम्यान कोरोना संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कुटूंबीयांना मदत देण्याचा उपक्रम मॅनकाईंड कंपनीने राज्यभरात राबवला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील पशुसंवर्धन विभागात कार्यरत असलेले पशुधन विकास अधिकारी डॉ.डी.एस.देशमुख यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटूंबाला तीन लाख रुपयांची मदत मॅनकाईंड कंपनीच्या वतीने करण्यात आली. मदतीचा धनादेश  नुकताच पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.डी.पी. तांदळे यांच्या हस्ते अरुणा देशमुख यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी डॉ.डी.टी. मसने, डॉ.श्रीनिवास पाथरकर, डॉ.सुदर्शन मुंडे, डॉ.आर.आर.ठाकुर, डॉ.विवेकानंद गिरी, डॉ.डी.जी. शिंदे, ओमप्रकाश उपरे, जितेंद्र झंवर, विनोद कुलकर्णी,, कंपनीचे झोनल मॅनेजर गणेश कदम, मॅनेजर लेखराम निमजे, परमेश्‍वर धापसे, कृष्णा चव्हाण यांची उपस्थिती होती.

गरजेच्या वेळी मदत


पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन विभागातील डॉ.डी.एस.देशमुख यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांना मॅनकाईंड कंपनीच्या वतीने मदतीचा धनादेश देण्यात आला. कंपनीने आर्थिक मदत केली त्याबद्दल आम्ही कंपनीचे आभारी आहोत अशी प्रतिक्रिया डॉ.एस.जी.पाथरकर यांनी व्यक्त केली.मॅनकाईंड फार्मासुटिकल्सतर्फे पशुसंवर्धन खात्यातील कोव्हीडमुळे मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कुटूंबास देत असलेल्या आर्थिक मदतीचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. स्वयंप्रेरणेने देशभरातील आपदग्रस्त कुटूंबांना मदत करण्याचा उपक्रम नक्कीच दिलासादायक आहे. या माध्यमातून कंपनीने आपल्या सामाजिक जाणीवेची प्रचिती दिली आहे.

डॉ.डी.पी.तांदळे, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धनविभाग, अंबाजोगाई.

पशुधनाचे आजार ओळखून त्यांना वेदनामुक्त करणार्‍या पशुसंर्धन विभागाच्या सेवेतील पशुधन विकास अधिकारी डॉ.डी.एस. देशमुख यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या कार्याची दखल घेत देशमुख कुटूंबीयांना धीर देत आर्थिक मदत केली. हा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे.
ः डॉ.एस.एस.मुंडे, पशुधन विकास अधिकारी, पं.स.अंबाजोगाई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा