Subscribe Us

header ads

पालीच्या तळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी) शहरातील दोन अल्पवयीन तरुणांचा पालीच्या तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी च्या सुमारास घडली आहे. अशी माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.ओमकार लक्ष्मण काळे (वय 16) व शिव संतोष पिंगळे (वय 16) अशी त्यांची नावे असुन हे राहणार शिंदे नगर येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोघे पालीच्या तळ्यावर गेले होते. त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना मिळताच त्यांनी कर्मचारी पी टी चव्हाण आनंद म्हस्के यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली दोन्ही अल्पवयीन तरुणाचे मृतदेह तलावाच्या सांडव्याजवळ आढळून आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलिस करत आहेत. या घटनेने शहरांमध्ये एकच खळबळ उडाली असून हा घातपात की अपघात याचा पुढील तपास पोलिस करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा