Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आंबेसावळी-पोखरीच्या चेअरमनसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना धक्का; नाळवंडी सर्कलमध्ये आ.संदीप भैय्यांची पकड मजबूत

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- नाळवंडी जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्ते आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडले जात आहेत, सोमवारी पोखरी  व आंबेसावळी सेवा सोसायटी चेरमन सह येथीलशेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशने  शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना चांगलाच धक्का बसला असून नाळवंडी सर्कलमध्ये आ. संदीप भैय्यांची  पकड मजबूत होत आहे.बीड तालुक्यात आणि बीड विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक मजबुत होवू लागली आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबुत होवू 

लागलं आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोमवार दि.18 ऑक्टोबर 2021 रोजी येथे पोखरी येथे सेवा सोसायटीचे चेअरमन शहादेव लंगरे माजी सरपंच बंडु काळे, माजी सरपंच राजाभाऊ पिंगळे, सुंदर लांडे, रमेश लगरे तसेच आंबेसावळी येथील ग्रामपंचायत सदस्य साईनाथ निसर्गंध, से.सो.चेअरमन बापुराव गुंदेकर, माजी ग्रा.पं.सदस्य रमेश नाना गुंदेकर, 

किशोर नन्नवरे, शहोदव गुंदेकर, मुकुंद गुंदेकर, अर्जुन काका गुंदेकर, रवि गुंदेकर, अशोक गुंदेकर, विकास वाणी, बाळु गुंदेकर, प्रशंत बांडे, बाळु करांडे, रामहरी शिंदे, चंद्रसेन गुंदेकर, तुकाराम गुंदेकर, शहादेव बांडे यांच्यासह शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी महादेव उबाळे, सुनील पाटील,भाऊसाहेब डावकर, प्रकाश ठाकूर ,दादा लांडे, चौरंगनाथ पवार,उतरेशोर सोनवणे आदी उपस्थिती होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा