Subscribe Us

header ads

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांच्या संपर्क कार्यालयात आज 3000 जणांना मोफत ई-श्रम कार्डचे वाटप!

बीड स्पीड न्यूज 

परळी (दि. 18) : - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नगर परिषदचे गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध अंसघटित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नागरीक बंधू भगिनींकरीता मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीर घेण्यात आले होते तब्बल 3000 नागरीक बंधु भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला.आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये "ई-श्रम कार्ड" वितरित करण्याचा कार्यक्रम बाजीराव भैय्या धमराधिकारी यांच्या निवासस्थानाच्या समोरील संपर्क कार्यालय येथे संपन्न झाला. असंघटित क्षेत्रातील कामगारांना अपघाती विमा, राष्ट्रीय ओळख तसेच डाटा संकलन यांसारख्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या बाबींसाठी हे कार्ड आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री. बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. यावेळी श्री. बाळासाहेब देशमुख, श्री. वैजनाथ सोळंके यांनीही मनोगत व्यक्त केले. तर श्री. सचिन स्वामी यांनी कार्यक्रमाचे सूत्र 

संचालन केले. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथराव सोळंके, माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण, यांसह माजी नगरसेवक वैजनाथराव बागवाले,अमर मालक देशमुख,नारायणदेव गोपनपाळे,ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत मांडे,शिवसेनेचे नेते रमेश चौण्डे,दत्ताबुआ पूरी,वंदे मातरम सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीपभाउ जोशी,विजय पुजारी शिवसेनेचे युवका नेते सचिन स्वामी,रमेश लोखंडे,शिवकुमार व्यवहारे,नगरसेवक अनिल आष्टेकर,जयराज देशमुख,गोविंद कुकर,युवकनेते लालाखान पठाण,चारुदत्त करमाळकर,राहुल ताटे, शशिकांत बिराजदार,संतोष सालुंके,श्रीपाद पाठक,अभिजीत तांदळे,शिवाजी सरवदे,शाम कुकर,मजहर पठाण,प्रताप समिन्दरसाळवे,राज जगतकर,मजास इनामदार,गणेश फुलारी,बंडूकाका बागवाले,अतुल नरवाडकर,गणेश धुमाळ,शैलेन्द्र आर्विकर,बाबूराव बागवाले,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा