Subscribe Us

header ads

जोपर्यंत बीड जिल्ह्यातील सर्वच इनामी बोगस,खालसा, हडप केलेल्या जमिनीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम आदमी पक्ष शांत बसणार नाही.---- अशोक बजरंग येडे जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, बीड

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

सर्वत्र कारवाई करा;आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन दिले

बीड (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यात इनामी बोगस खालसा जमिनी प्रकरणी एकाच ठिकाणी कारवाई करून प्रशासनाने दुजाभाव केलेला आहे. जिल्ह्यातील सर्वच बोगस खालसा जमिनीप्रकरणी तात्काळ कारवाई करा  म्हणून आम आदमी पार्टीचे निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी निदर्शने करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव रामधन जमाले, बीड शहराध्यक्ष सय्यद सादेक प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत रामभाऊ शेरकर बाळासाहेब घुमरे लोकतान्त्रिक जनता दलाचे जिल्हाध्यक्ष कार्यकारी जिल्हा अध्यक्ष अमर जान पठाण पालवण येथील जमिनीचे तक्रारदार शेळके इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांची उपस्थिती होती.

श्री प्रकाश आघाव हे उपजिल्हाधिकारी सा. बीड या पदावर रुजू झाल्यापासून बीड जिल्ह्यातील मौजे बीड तरफ पिंगळे येथील शहेनशहावली दर्गाची १४५ एकर जमीन, माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील ३५० एकर जमीन, गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील शहेनशाहवली दर्गाची ४५० एकर जमीन, तळेगाव (परळी तालुका) ५६ एकर, बेलखंडी (पाटोदा) येथील गोसावी मठाची २५ एकर जमीन, शेपवाडी(ता अंबेजोगाई) येथील ६१० एकर जमीन बोगस खालसा करण्यासह धारूर तालुक्यातील ९५ एकर जमीन स्वतः खरेदी करून नातेवाईक व मित्रांच्या नावे करण्यात आल्याचे कळते असून अशाप्रकारे जिल्ह्यातील १० हजार एकर इनामी जमीनी हडपण्याचा डाव रचला गेला असून त्याबाबत तात्काळ चौकशी समिती नेमून श्री प्रकाश आघाव यांच्यावर कडक कारवाई करावी. एकदोन ठिकाणच्या कारवाई करून सामान्य जनतेला वेड्यात न काढता जिल्ह्यातील सर्वच बोगस खालसा केलेल्या इनामी जमिनींबाबत कारवाईचा दणका देण्यात यावा अन्यथा आम आदमी पार्टी, बीड जिल्ह्याकडून येत्या सोमवारी १० हजार एकर इनामी जमीन बोगस खालसा करण्याच्या या प्रकाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.  आम आदमी पक्षाकडून निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा